५४व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारताच्या पाच विद्यार्थ्यांची २ सुवर्ण, ३ रौप्यपदकांची कमाई

इराणमध्ये नुकत्याच झालेल्या ५४व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये सहभागी झालेल्या भारताच्या सर्व पाच विद्यार्थ्यांनी दोन सुवर्ण आणि तीन रौप्यपदकांची कमाई केली आहे. रिदम केडिया आणि वेद लाहोटी यांनी सुवर्ण, तर आकर्ष राज सहाय, भव्या तिवारी आणि जयवारी सिंह यांनी रौप्यपदकावर नाव कोरलं. प्राध्यापक दीपक गर्ग आणि डॉ. शिरीष पाठारे यांनी भारताच्या चमूचं नेतृत्व केलं, तर प्राध्यापक ए. सी. बियाणी आणि प्राध्यापक विवेक भिडे यांनी निरीक्षक म्हणून काम केलं. भारतानं या स्पर्धेत चौथं स्थान पटकावलं. चीननं पहिला, रशियाना दुसरं, तर रोमानियानं पहिला क्रमांक मिळवला.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.