उत्तरप्रदेशात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू

उत्तरप्रदेशात काल झालेल्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे.

नोएडा इथं ट्रॅक्टर आणि कारच्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर एक जण जखमी झाला आहे. जखमीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या मृत्यूबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त केली आहे. याप्रकरणी ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दरम्यान, सोनभद्रमध्ये कारचालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे झालेल्या अपघातात एक जणाचा मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.