डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुंबई- पुणे महामार्गावर बस अपघातात ५ जणांचा मृत्यू

मुंबई- पुणे महामार्गावर आज सकाळी झालेल्या बस अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. जखमी झालेल्या ४५ प्रवाशांना कळंबोलीच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यापैकी ७ जणांची प्रकृती सुधारल्यानं त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीहून पंढरपूरला जाणारी बस ट्रॅक्टरला धडकून दरीत कोसळली.  

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज कळंबोलीतल्या एमजीएम रूग्णालयात भेट देऊन रूग्णांची चौकशी केली. सरकारकडून मृतांच्या कुटुंबांना प्रत्येकी पाच लाख रूपयांची मदत, तसंच जखमींच्या उपचाराचा खर्च सरकार करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. ट्रॅक्टरसाठी बंदी असताना महामार्गावर ट्रॅक्टर कसा आला याची चौकशी केली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.