डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात सुरक्षा दलाचे ५ जवान शहीद

जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात काल रात्री दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत गंभीर जखमी झालेल्या पाच सुरक्षादल जवानांचा आज मृत्यू झाला. यात लष्कराच्या एका अधिकाऱ्याचाही समावेश आहे. या भागात दहशतवाद्यांचा वावर असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर राष्ट्रीय रायफल्स आणि जम्मू-काश्मीर पोलिसांच्या विशेष कार्य दलाच्या पथकांनी शोधमोहीम राबवली.

 

या दरम्यान दहशतवाद्यांशी चकमक होऊन पाच जवान जखमी झाले होते. त्या पाचही जणांना आज वीरमरण आलं. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी याबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. कर्तव्य बजावत असताना प्राणांची आहुती देणाऱ्या या जवानांच्या कुटुंबीयांसोबत देश खंबीरपणे उभा आहे, असं त्यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनीही या हुतात्म्यांना आदरांजली वाहिली आहे.