चौथी हाॅकी इंडिया वरिष्ठ महिला आंतरविभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून सुरू

चौथी हाॅकी इंडिया वरिष्ठ महिला आंतर विभागीय राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धा उद्यापासून नवी दिल्लीतल्या मेजर ध्यानचंद क्रीडांगणावर सुरु होणार असून ती २१ तारखेपर्यंत चालणार आहे. या स्पर्धेत चार गटांमध्ये एकूण१२ संघ सहभागी होणार आहेत. साखळी सामन्यांमध्ये प्रत्येक संघ आपल्या गटातल्या सर्व संघांबरोबर खेळेल.