४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात दाखवण्यात आला देशातल्या डिजिटल परिसंस्थेच्या परिवर्तनाचा प्रवास

नवी दिल्लीत आयोजित ४४ व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात डिजिटल इंडिया मंडपामधे देशातल्या डिजिटल परिसंस्थेच्या परिवर्तनाचा प्रवास दाखवण्यात आला आहे. यात डिजिलॉकर, उमंग, माय स्कीम, नीक्सी, नील्ट सर्ट इन, भारत सेमिकंडक्टर मिशन आणि आधार यांचा समावेश आहे. डिजिटल इंडिया उपक्रमाद्वारे डिजिटल सक्षमीकरण, पारदर्शकता आणि समावेशकतेला देशात कशाप्रकारे प्रोत्साहन दिलं जात आहे, हे या प्रदर्शनातून दाखवल्याचं इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.