स्टार्टअप उद्योग आणि बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी शासन नेहमीच प्रयत्नशील असल्याचं उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीच्या प्रगती मैदानावर आयोजित ४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन करताना ते बोलत होते. यंदाच्या प्रदर्शनात महाराष्ट्राला भागीदार राज्याचा दर्जा मिळाला असून एक भारत श्रेष्ठ भारत संकल्पनेवर आधारित उत्पादनं ६० कक्षांमधे उपलब्ध आहेत. युनेस्कोकडून जागतिक वारसा म्हणून मान्यता मिळालेल्या शिवकालीन किल्ल्यांच्या धर्तीवर दालनाची रचना केली आहे.
Site Admin | November 14, 2025 6:53 PM | Minister Uday Samant
४४व्या भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळाव्यात महाराष्ट्राच्या दालनाचं उद्घाटन