नवी दिल्लीत भारत मंडपम इथं आजपासून ४४ वा भारत आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा सुरू होत आहे. यंदाचा हा व्यापार मेळा, ‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या मध्यवर्ती संकल्पनेवर आधारित आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, राजस्थान आणि बिहार ही राज्यं या आंतरराष्ट्रीय मेळ्यात सहभागी झाली असून यामध्ये झारखंड हे राज्य केंद्रस्थानी असणार आहे. युएई, चीन, इराण, दक्षिण कोरिया आणि इजिप्तसह १२ देशांचा, या १४ दिवस चालणाऱ्या व्यापार मेळ्यात सहभाग आहे.
महाराष्ट्राच्या दालनाचं उद्धाटन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.