डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

3rd T20: भारताचा ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय

भारत-ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी क्रिकेट मालिकेत आज ऑस्ट्रेलियात होबार्ट इथं झालेल्या तिसऱ्या सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियावर ५ गडी राखून विजय मिळवला. भारतानं नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. ऑस्ट्रेलियानं निर्धारित २० षटकात ६ गडी गमावून १८६ धावा केल्या. टीम डेव्हिडनं ७४, तर मार्कुस स्टॉइनिसनं ७४ धावा केल्या. भारतातर्फे अर्शदीप सिंगनं ३, तर वरुण चक्रवर्तीनं २, तर शुभम दुबेनं एक गडी बाद केला. 

 भारतानं ५ गडी गमावून १८८ धावा करत, सामन्यातले ९ चेंडू बाकी असताना  विजयी लक्ष्य पार केलं. वॉशिंग्टन सुंदरच्या नाबाद ४९ धावांचा त्यात मोलाचा वाटा आहे. जितेश शर्मानं नाबाद २२ धावा केल्या. 

अर्शदीप सिंग सामन्यातला सर्वोत्कृष्ठ खेळाडू ठरला.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.