भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ इथं रंगलेल्या आजच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा ९ गडी राखून पराभव केला. तीन सामन्यांच्या या मालिकेतील या आधीचे दोन्ही सामने आणि मालिका ऑस्ट्रेलियाने जिंकली आहे.
ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करत ४६ षटकं आणि ४ चेंडूत २३६ धावा केल्या. भारतान केवळ ३८षटकं ३ चेंडूत ही धावसंख्या पार केली. रोहित शर्माच्या १२१ धावांच्या खेळीला विराट कोहलीनं ७४ धावा काढून चांगली साथ दिली. या दोघांच्या १६७ धावांच्या भागीदारीच्या जोरावर भारतानं हा विजय नोंदवला. रोहित शर्माला सामनावीर आणि मालिकावीराचा मान मिळाला.