श्रीलंकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुुकीत ३९ उमेदवार रिंगणात

श्रीलंकेतल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी ३९ उमेदवार रिंगणात आहे. २१ सप्टेंबर रोजी ही निवडणूक होणार आहे. आर्थिक संकटानंतर श्रीलंकेत पहिल्यांदाच अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. विद्यमान अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, विरोधी पक्षनेते साजित प्रेमदासा आणि मार्क्सवादी नेते अनुरा दिस्सानायके यात प्रमुख उमेदवार आहेत.