डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

हरियाणात ३८व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळाव्याचं आयोजन

हरियाणातील फरीदाबाद इथे आयोजित ३८ व्या सूरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला मेळाव्यात देशभरातून मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते. यंदा मध्य प्रदेश आणि ओडिशा राज्यांनी हा मेळावा आयोजित केला आहे. यामध्ये इजिप्त, इथिओपिया, सीरिया, अफगाणिस्तान, बेलारूससह ४२ देशांतील सहाशे प्रदर्शक सहभागी होत आहेत. याशिवाय, बांगलादेश, भूतान, म्यानमार, नेपाळ, श्रीलंका आणि थायलंड या बिमस्टेक राष्ट्रांसह अनेक देश देखील या मेळाव्यात सहभागी होत आहेत. या मेळ्याचा उद्देश हस्तकला उत्पादने आणि हातमाग यांना प्रोत्साहन देणे आहे.