डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

३८व्या राष्ट्रीय क्रीडास्पर्धांमधे महाराष्ट्राचं पदकांचं शतक पूर्ण

उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्राने पदकांची शंभरी पार केली आहे. महाराष्ट्राकडे सर्वाधिक १०७ पदकं असून त्यात २३ सुवर्ण, ३९ रौप्य आणि ४५ कांस्य पदकांचा समावेश आहे. या स्पर्धेत फुटबॉल, मुष्टीयुद्ध आणि तिरंदाजी खेळांमध्ये काल विविध मणिपूर, आसाम आणि महाराष्ट्र या राज्यांनी चमकदार कामगिरीचे प्रदर्शन केलं. महिला मुष्टियुद्धात महाराष्ट्राच्या दिव्या पवारनं ४५ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तर उत्तराखंडच्या निवेदिता कार्कीनं लाईट फ्लायवेट प्रकारात सुवर्ण पदक मिळवलं. महिलांच्या सांघिक टेनिसच्या अंतिम फेरीत, महाराष्ट्राने गुजरातवर विजय मिळवत सुवर्णपदक जिंकलं, तर पुरुषांच्या सांघिक स्पर्धेत, तामिळनाडूनं कर्नाटकला हरवून अव्वल स्थान पटकावलं. पुरूषांच्या फुटबॉलच्या अंतिम सामन्यात केरळने उत्तराखंडचा पराभव करत सुवर्ण पदकाला गवसणी घातली.