उत्तराखंडमध्ये सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या पदक तालिकेत महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर कायम आहे. महाराष्ट्राकडे सध्या सर्वाधिक १६७ पदकं असून यात ४७ सुवर्ण, ६० रौप्य आणि ६० कांस्य पदकांचा समावेश आहे. सेना दलं या पदकतालिकेत ५९ सुवर्ण पदकांसह पहिल्या स्थानावर तर ३४ सुवर्णपदकांसह कर्नाटक दुसऱ्या स्थानावर आहे.
४०० मीटर अडथळा शर्यतीत महाराष्ट्राच्या नेहा धाबळे हिने १ मिनीट ५२ मिनीसेकंद इतकी वेळ नोंदवत कांस्यपदक पटकावलं. महिलांच्या ५ हजार मीटर धावण्याच्या शर्यतीत महाराष्ट्राच्या संजीवनी जाधव हिने १५ मिनिटं ५९ सेकंद १२ मिनीसेकंद इतकी वेळ नोंदवत रौप्य पदक जिंकलं, तर तिची सहकारी पूनम सोनु हिने या शर्यतीत कास्य पदक जिंकलं. मिश्र रिले स्पर्धेत महाराष्ट्राच्या संघाने रौप्य पदक पटकावलं. शामराव दौंडकर, मानसी भारेकर, निखील ढाके आणि ऐश्वर्या मिश्रा यांनी ही स्पर्धा ३ मिनिटं २५ सेकंद ३५ मिनीसेकंद इतकी वेळ नोंदवली.