सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत रत्नागिरीत आढळले ३४ रुग्ण

राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातल्या सक्रिय क्षयरुग्ण शोधमोहिमेत 34 क्षयरुग्ण आढळले अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉक्टर महेंद्र गावडे यांनी दिली आहे. या रुग्णांवर उपचार केले जात आहेत.