डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती शासनाकडून ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद – मुख्यमंत्री

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी महायुती शासनाकडून ३३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातल्या जिगांव प्रकल्पासाठी भरीव निधीची तरतूद केली असून शेतकऱ्यांना दिवसाही वीज पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज बुलडाणा इथं दिलं. 

 

मुख्यमंत्री महिला सशक्तिकरण अभियानांतर्गत आयोजित करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी सन्मान मेळाव्यावेळी ते बोलत होते. या मेळाव्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार, केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव उपस्थित होते. 

 

तत्पूर्वी बुलडाणा शहरात आज छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्यासह बुलढाणा शहरात २६ स्मारकांचं लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांनी केलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.