मराठी विज्ञान परिषदेच्या शिष्यवृत्तीसाठी ३२ विद्यार्थ्यांची निवड होणार

मराठी विज्ञान परिषदेच्या शिष्यवृत्ती योजनेसाठी या वर्षी ३२ विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या शिष्यवृत्तीकरता भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि गणित या विषयातल्या प्रत्येकी आठ म्हणजे एकूण ३२ विद्यार्थ्यांची निवड केली जाईल. २०२४-२०२५ या शैक्षणिक वर्षात एम.एससी. किंवा एम.ए.गणित ह्या अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षाकरिता प्रवेश घेतलेले विद्यार्थी या शिष्यवृत्तीसाठी पात्र असतील. संबंधित विद्यार्थ्यांनी दिनांक ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत अर्ज करावा. अधिक माहितीकरता ९९ ६९ १०० ९६१ तसंच mavipa.org या संकेतस्थळावर संपर्क साधावा, असं आवाहन विज्ञान परिषदेनं केलं आहे.