डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

May 14, 2025 8:05 PM | Chhattisgarh

printer

छत्तीसगढमध्ये ३१ माओवादी ठार

छत्तीसगढच्या विजापूर जिल्ह्यात करेगुट्टा इथे गेल्या २१ दिवसांपासून सुरू असलेल्या माओवादविरोधी कारवाईत ३१ माओवादी ठार झाले आहेत. यात १६ महिला माओवाद्यांचा समावेश आहे. केंद्रीय राखीव पोलीस दलाचे महासंचालक ज्ञानेंद्र प्रताप सिंह यांनी आज विजापूर इथ वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. गेल्या महिन्यात २१ तारखेपासून ते ११ मे पर्यंत चालवण्यात आलेल्या या कारवाईत एकूण २१ चकमकी झाल्या. या काळात सेल्फ लोडिंग प्रकारच्या रायफल्स, शस्त्रं तसंच साडेचारशे आयईडी जप्त करण्यात आली आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. याशिवाय माओवाद्यांची लपण्याची ठिकाणं तसंच २१४ बंकरही उद्ध्वस्त करण्यात आले.