डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

November 9, 2024 7:39 PM

printer

सी-व्हिजिल ॲपवर ३ हजार ७६४ तक्रारी प्राप्त

राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून आजपर्यंत सी-व्हिजिल ॲपवर ३ हजार ७६४ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यापैकी ३ हजार ७३४ तक्रारी निकाली काढल्याची माहिती निवडणूक आयोगानं दिली आहे. याशिवाय राज्य आणि केंद्र शासनाच्या विविध अंमलबजावणी यंत्रणांनी केलेल्या कारवाईत बेकायदा पैसे, दारू, अंमली पदार्थ आणि मौल्यवान धातू अशी एकूण ३९८ कोटी ४० लाख रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.