डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

July 20, 2024 11:07 AM | Pune | Zika Virus

printer

पुण्यात आणखी 3 जणांना झिकाचा संसर्ग

पुण्यात आणखी 3 जणांना झिकाचा संसर्ग झाला आहे. यामध्ये एका गर्भवतीसह 2 ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे. शहरातल्या झिकाच्या रुग्णांची संख्या आता 27 झाली असल्याचं महापालिकेच्या आरोग्य विभागानं म्हटलं आहे. यामध्ये 11 गर्भवती आहेत. दरम्यान, अहमदनगर जिल्ह्यात संगमनेर शहरातल्या 2 गरोदर महिलांचा झिका विषाणूचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. या दोघींना कोणतीही लक्षणं नाहीत तसंच त्यांच्या गर्भाची प्रकृतीही चांगली आहे.

 

मात्र खबरदारीचा उपाय म्हणून दोन दिवसांपासून पुन्हा नव्यानं संपूर्ण शहराचं सर्वेक्षण सुरू करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर बापूसाहेब नागरगोजे यांनी दिली. नागरिकांनी आपल्या घराच्या आवारात, सोसायटी, तसंच कार्यालय परिसरात पावसाचं पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन आरोग्य विभागानं केलं आहे.