लोणेरे श्रीवर्धन मार्गावर कार अपघातात ३ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर काल संध्याकाळी एक भरधाव कार झाडाला आदळून उलटल्यानंतर त्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. अन्य दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातील मुनवली इथं तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला. यापैकी एका मुलाच्या मृतदेहाचा शोध घेण्यात येत आहे.