डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतल्या दुसऱ्या सामन्याला सुरुवात

ऑस्ट्रेलियातल्या ॲडलेड मैदानावर बॉर्डर-गावस्कर करंडक कसोटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना सुरू आहे. भारतीय संघाने आज नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीपुढे भारतीय फलंदाज ढेपाळले. भारताचा सलामीवीर यशस्वी जयस्वाल पहिल्याच चेंडूवर भोपळाही न फोडता बाद झाला. रोहित शर्मा अवघ्या तीन धावांवर तर विराट कोहली केवळ सात धावा करून तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाच्या मिशेल स्टार्कनं ६ गडी टिपून भारतीय फलंदाजीला खिंडार पाडलं. नितीश रेड्डीच्या ४२, के. एल राहुलच्या ३७ तर  शुभमन गिलच्या ३१ धावांच्या बळावर भारतीय संघाला अवघ्या १८० धावा करता आल्या. त्यानंतर फलंदाजीला उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं दिवस अखेर एक बाद ८६ पर्यंत मजल मारली आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.