दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या आणि अंतिम कसोटी सामन्यात भारताचा पराभव झाला आणि ही मालिकांही भारतानं २-० अशी गमावली. आज पाचव्या दिवशी २ बाद २७ वरून सुरू झालेला भारताचा डाव अवघा १४० धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात ४८९ तर दुसऱ्या डावात २६० धावा केल्या होत्या. भारताचा संघ पहिल्या डावात २०१ तर दुसऱ्या डावात १४० धावा करून तंबुत परतला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेनं हा सामना ४०८ धावांनी जिंकला. दुसऱ्या डावात भारताकडून रविंद्र जडेजाने सर्वाधिक ५४ धावा केल्या. उर्वरित बहुतांश फलंदाज २० धावांचा आकडाही गाठू शकले नाहीत.
या पराभवानंतर कसोटी क्रिकेट क्रमवारीत भारताची घसरण झाली असून तो आता पाचव्या स्थानावर आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर, दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, न्यूझीलंड तिसऱ्या तर पाकिस्तान चौथ्या स्थानावर आहे.