डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

महिला क्रिकेटमध्ये दुसऱ्या T20 सामन्यात वेस्टइंडिजचा भारतावर विजय

महिला क्रिकेटमध्ये वेस्ट इंडिजनं काल नवी मुंबईत झालेल्या २० षटकांच्या दुसऱ्या सामन्यात भारतावर ९ गडी राखून मात केली. तीन सामन्यांच्या या मालिकेत दोन्ही संघाची १-१ अशी बरोबर झाली आहे. वेस्ट इंडिजची कर्णधार हैले मॅथ्यूजनं ८५ धावा केल्या. तिला सामनावीर म्हणून घोषित करण्यात आलं. भारतानं वेस्टइंडिजसमोर १६० धावाचं लक्ष्य ठेवलं होतं.