नवी दिल्लीतल्या इंदिरा गांधी इन्डोअर स्टेडियमवर आजपासून दुसरी आशियाई योगासन विजेतेपद स्पर्धा सुरू होत आहे. तीन दिवस म्हणजे २७ तारखेपर्यंत चालणाऱ्या या स्पर्धेत २१ आशियाई देशांमधले १७० हून अधिक योगपटू सहभागी होणार आहेत.
योगासनांचा जागतिक पातळीवर स्पर्धात्मक क्रीडा प्रकार म्हणून प्रसार करण्याच्या सरकारच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं आहे.