डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पाकिस्तान कारागृहातल्या २,६३९ भारतीय मच्छीमारांची सुटका – मंत्री डॉ.एस जयशंकर

केंद्रसरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे गेल्या दहा वर्षात पाकिस्तानच्या कारागृहात खितपत पडलेल्या २ हजार ६३९ भारतीय मच्छीमारांची सुटका करण्यात आली आहे, अशी  माहिती परराष्ट्र व्यवहारमंत्री डॉ. एस जयशंकर यांनी आज लोकसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.  पाकिस्ताननं यावर्षी  २११ भारतीयांना ताब्यात घेतल्याची कबुली दिली आहे, त्यापैकी २४ जण दमण आणि दीवमधले मच्छिमार आहेत.या सर्वांची लवकरात लवकर सुटका करून त्यांना जलद मायदेशी रवाना करण्याची कार्यवाही करावी असं पाकिस्तान सरकारला सांगितल्याचं जयशंकर म्हणाले.