डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भाग घेणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये सशस्त्र दलाचे २४ जवान

पॅरिस इथं येत्या सोमवारपासून सुरू होत असलेल्या ऑलिंपिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होणाऱ्या ११७ भारतीय खेळाडूंमध्ये चोवीस सशस्त्र दलाचे जवान सहभागी होणार आहेत. सुप्रसिद्ध भालाफेकपटू आणि २०२० मधल्या टोकियो ऑलिंपिक मधला सुवर्णपदक विजेता सुभेदार नीरज चोप्रा याच्यासह एकूण २२ पुरुष आणि दोन महिला खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतील.

 

भारतीय लष्करी कर्मचाऱ्यांच्या तुकडीतल्या दोन महिला खेळाडूंचं सादरीकरण या स्पर्धांमध्ये पाहता येईल, असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. नीरज चोप्रा यंदाही विजेतेपदासाठी लढणार असून कॉमनवेल्थ गेम्स २०२२ ची कांस्यपदक विजेती हवालदार जॅस्मिन लंबोरिया आणि आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप २०२३ मधली कांस्यपदक विजेती ऋतिक हुड या दोन सेवा कर्मचारी प्रथमच ऑलिंपिक मध्ये सहभागी होत असल्याच मंत्रालयानं सांगितलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा

कोणतीही पोस्ट आढळली नाही.