राज्याच्या कृषी विभागात बॅटरी स्प्रेअर खरेदीत २३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे. महायुती सरकारमध्ये कृषी विभाग हा भ्रष्टाचाराचं कुरण बनल्याची टीकाही पटोले यांनी केली आहे. महाराष्ट्र कृषि उद्योग विकास महामंडळातल्या अधिकारी आणि कृषी विभागाने संगनमताने हा भ्रष्टाचार केला आहे. बॅटरी स्प्रेअरचा दर २ हजार ४५० रुपये असताना तो अपात्र कंपन्यांकडून ३ हजार ४२५ रुपये दराने खरेदी करण्यात आला, असा आरोप पटोले यांनी केला आहे.
Site Admin | February 7, 2025 7:26 PM
राज्याच्या कृषी विभागात बॅटरी स्प्रेअर खरेदीत २३ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
