डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
Listen to live radio

छत्तीसगडमधे २२ माओवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या नारायणपूर जिल्ह्यात आज २२ माओवाद्यांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं. या सर्वांवर मिळून सुमारे साडे सदतीस लाखाचं बक्षीस ठेवण्यात आलं होतं, अशी माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक रॉबिन्सन गुरिया यांनी दिली.

 

आत्मसमर्पण केलेल्या माओवाद्यांना प्रत्येकी ५० हजार रुपये मदतीच्या रूपात देण्यात आले. याशिवाय त्यांच्या पुनर्वसनासाठी इतर सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.