2030मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी यजमान शहर म्हणून गुजरातमधील अहमदाबाद शहराची शिफारस करण्यात आली आहे. भारताच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही एक ऐतिहासिक बाब मानली जात आहे. राष्ट्रकुल क्रीडा संघटनेच्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या क्रीडा स्पर्धा राष्ट्रकुल क्रीडा चळवळीच्या शताब्दी समारंभाच्या अनुषंगानं होणार आहेत.
पुढच्या महिन्यात होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा संघटनेच्या महासभेसमोर ही शिफारस मांडण्यात येईल. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी या घटनेबद्दल आनंद व्यक्त केला असून याचं श्रेय पंतप्रधान मोदींच्या दूरदर्शी नेतृत्वाला दिलं आहे. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांसाठी अहमदाबादची निवड होणं हा भारतासाठी अभिमानाचा क्षण असेल असं केंद्रीय क्रीडा मंत्री मानसुख मांडविय यांनी म्हटलं आहे.