November 15, 2025 6:54 PM

views 26

X S I O इंडस्ट्री आणि राज्याचा उद्योग विभाग यांच्यात ५ हजार १२७ कोटी रुपयांचे करार

X S I O इंडस्ट्री, ब्लॅकस्टोन आणि राज्याचा उद्योग विभाग यांच्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज ५ हजार १२७ कोटी रुपयांच्या करारावर स्वाक्षऱ्या झाल्या. गुंतवणुकीची ही रक्कम ३ हजार कोटींनी वाढवून ८ हजार कोटी करण्यात येईल, अशी घोषणा X S I O आणि ब्लॅकस्टोन कंपनीच्या वतीनं करण्यात आली. ...

November 15, 2025 6:49 PM

views 33

नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या रविवारीही उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार

  नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी उद्या, रविवारी देखील उमेदवारी अर्ज स्वीकारले जातील, असं निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. उमेदवारी अर्ज प्रत्यक्ष भरता येतील तसंच ऑनलाईनही दाखल करता येणार आहेेत, असं निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. १७ नोव्हेंबरला उमेदवारी अर्ज दाखल करायची अंतिम मुदत आहे.          दरम...

November 15, 2025 6:08 PM

views 29

केंद्रीय वस्त्रोद्योग सचिवांचा मुंबई दौरा

  वस्त्रोद्योग मूल्य साखळीतील नावीन्य, शाश्वतता, आणि जागतिक स्पर्धात्मकतेला प्रोत्साहन देण्याप्रति केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्रालय वचनबद्ध असल्याचं केंद्रीय वस्त्रोद्योग सचिव आणि वस्त्रोद्योग समितीच्या अध्यक्ष नीलम शमी राव यांनी सांगितलं. वस्त्रोद्योग मंत्रालयाअंतर्गत कार्यरत विविध संस्थांमध्ये सध्या...

November 15, 2025 5:40 PM

views 77

देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा

स्वातंत्र्य सेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी देशभरात आज आदिवासी गौरव दिवस साजरा होत आहे. आजचा दिवस आदिवासी संस्कृतीच्या गौरवशाली इतिहासाचं महत्व अधोरेखित करतो. या निमित्तानं देशभर विविध सांस्कृतिक कार्यक्रम, प्रदर्शनं आणि शैक्षणिक उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यंदा बिरस...

November 15, 2025 5:41 PM

views 370

शिल्पकार राम सुतार यांना ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार प्रदान

विख्यात शिल्पकार राम सुतार यांनी घडवलेली शिल्पं इतिहासाची साक्षीदार असून त्यातून अभिव्यक्त होणारा वारसा शेकडो वर्षं अबाधित राहील अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राम सुतार यांचा गौरव केला. सुतार यांना महाराष्ट्र सरकारचा सर्वोच्च नागरी सन्मान असणारा ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार काल मुख्यमं...

November 15, 2025 5:08 PM

views 24

बीड जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लंपी’ या त्वचारोगामुळे ५८ जनावरं दगावली

बीड जिल्ह्यात जनावरांमध्ये ‘लंपी’ या त्वचारोगामुळे आतापर्यंत ५८ जनावरं दगावली असून, जिल्ह्याच्या विविध भागांत ९०० जनावरांना त्याचा संसर्ग झाला आहे. याची दखल घेऊन, शासनानं प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी खासदार बजरंग सोनावणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फड...

November 15, 2025 6:45 PM

views 38

गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध पुरस्कार’ जाहीर

विठ्ठल उमप फाऊंडेशनचा ‘मृदगंध जीवनगौरव पुरस्कार’ गझलनवाझ भीमराव पांचाळे यांना जाहीर झाला आहे. हा पुरस्कार साहित्य, सामाजिक कार्य, लोककला, अभिनय आणि संगीत यांसारख्या विविध क्षेत्रांतील व्यक्तींना दिला जातो. शाहीर विठ्ठल उमप यांच्या १५व्या स्मृतीदिनानिमित्त १५वा लोकशाहीर विठ्ठल उमप स्मृती संगीत समारंभ...

November 15, 2025 4:23 PM

views 25

अनसूयाबाई काळे स्मृती सदनाचे मुखमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

आपला समाज इतिहास विसरतो, त्यामुळेच कधी काळी आपल्याला गुलामगिरीत जावे लागले होते. त्यामुळे परिवर्तनवादी व्यक्तींचा इतिहास विसरू नका, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. उत्तर अंबाझरी मार्गावरील अनसूयाबाई काळे स्मृती सदन आणि पूर्व विदर्भ महिला परिषदेच्या वर्किंग वूमन अँड गर्ल्स होस्टेलच्...

November 15, 2025 4:08 PM

views 25

तालिबानवरील निर्बंधांवरील सुरक्षा परिषदेच्या समितीचे नेतृत्व करणाऱ्या पाकिस्तानवर भारताची टीका

पाकिस्ताननं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या तालिबान विरोधातल्या निर्बंधांसाठी गठित करण्यात आलेल्या समितीचं अध्यक्षपद, तसंच दहशतवाद विरोधी पॅनलचं सह अध्यक्षपद भूषवण्यावर भारतानं तीव्र आक्षेप नोंदवला आहे. स्वतःचे हितसंबंध जपणाऱ्या सदस्यांना परिषदेच्या अध्यक्षपदापासून दूर ठेवायला हवं, असं संयुक्त रा...

November 15, 2025 4:03 PM

views 21

द्विपक्षीय सुरक्षा, व्यापार करारांवरील संयुक्त तथ्यपत्रकाच्या प्रकाशनाने अमेरिका आणि दक्षिण कोरियाने नवा अध्याय सुरू केला: लांदेऊ

अमेरिका आणि दक्षिण कोरियानं द्विपक्षीय सुरक्षा आणि व्यापार करारावर संयुक्त तथ्यपत्रक प्रसिद्ध करून परस्परांबरोबरचे संबंध नव्या पातळीवर नेले आहेत, असं अमेरिकेचे उप-परराष्ट्र सचिव क्रिस्तोफर लांदेऊ यांनी म्हटलं आहे. आशिया-पॅसिफिक आर्थिक सहकार्य शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट...