November 16, 2025 3:47 PM

views 94

कोलकाता कसोटी क्रिकेट सामन्यात भारताचा दक्षिण आफ्रिकेकडून ३० धावांनी पराभव

कोलकाता इथं झालेला पहिल्या कसोटी क्रिकेट सामन्यात दक्षिण आफ्रिकेनं आज तिसऱ्याच दिवशी भारतावर ३० धावांनी विजय मिळवला, आणि दोन सामन्यांच्या या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. आज दक्षिण आफ्रिकेनं आपला दुसरा डाव कालच्या ७ बाद ९३ धावांवरून पुढे सुरू केला. आठव्या गड्यासाठी कर्णधार टेम्बा बवुमा आणि कॉर्बिन या...

November 16, 2025 6:05 PM

views 67

महाराष्ट्रात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपांच चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल-मुख्यमंत्री

राज्यातल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र येत्या दोन दिवसांत स्पष्ट होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.छत्रपती संभाजीनगर इथं ते वार्ताहरांशी बोलत होते. या निवडणुकांच्या जागावाटपाचे निर्णय जिल्हास्तरावर होतात, त्यामुळे क...

November 16, 2025 3:42 PM

views 150

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी एसटीच्या नवीन बस मिळणार

राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एसटीच्या नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. राज्याचे परिवहन मंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली. शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा याम...

November 16, 2025 4:51 PM

views 22

‘डोकलाम’ आणि ‘चो-ला’ ही ठिकाणं पर्यटकांसाठी खुली करण्याचा सिक्कीम सरकारचा निर्णय

सीमावर्ती भागातल्या पर्यटनाला चालना देण्याच्या दिशेने सुरु असलेल्या प्रयत्नांचा भाग म्हणून, सिक्कीम सरकारने ‘डोकलाम’ आणि ‘चो-ला’ ही धोरणात्मकदृष्ट्या संवेदनशील ठिकाणं पर्यटकांसाठी खुली करण्याचा निर्णय घेतला आहे. सिक्कीमच्या पर्यटन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सी.एस. राव यांनी वार्ताहर परिषदेत ही माह...

November 16, 2025 3:00 PM

views 27

मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील -हवामान विभाग

मराठवाडा, विदर्भ, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडच्या काही भागात उद्यापर्यंत थंडीची लाट राहील, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. पूर्व राजस्थान, झारखंड आणि उत्तरप्रदेशमध्ये तुरळक ठिकाणी आज थंडीची लाट राहील, तर तामिळनाडू आणि करैकलमध्ये आज जोरदार ते अती जोरदार पावसाची शक्यता आहे. दरम्यान, राजधानी दिल्ली परिसरात ...

November 16, 2025 2:51 PM

views 31

भारतीय राजदूत पुनित रॉय कुंडल यांनी भारतीय प्रदर्शनासाठी अध्यक्ष मार्सेलो रेबेलो दे सूझा यांचे स्वागत केले

पोर्तुगालची राजधानी लिस्बन इथं सुरूअसलेल्या डिप्लोमॅटिक बझार २०२५मधल्या भारताच्या प्रदर्शनाला पोर्तुगालचे अध्यक्ष मार्सेलो रेबेलो दे सूझा यांनी काल भेट दिली. भारताचे पोर्तुगालमधले राजदूत पुनीत रॉय कुंडल यांनी त्यांचं स्वागत केलं. भारताचा समृद्ध सांस्कृतिक वारसा आणि भारत-पोर्तुगाल यांच्यातल्या राजनैत...

November 16, 2025 2:43 PM

views 35

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले अन्नपदार्थ आयातीवरचे कर कमी

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अन्नपदार्थ आयातीवरचे कर कमी केले आहेत. भारतातून विशेषतः महाराष्ट्रातून होणाऱ्या आंबा आणि डाळिंबाच्या निर्यातीला याचा लाभ होणार आहे. उष्णकटिबंधीय प्रदेशातून येणारी फळं आणि फळांचे रस, चहा आणि मसाले यांच्यावर परस्पर शुल्काचा परिणाम होणार नाही. व्हाईट हाऊसनं नमूद क...

November 16, 2025 2:38 PM

views 32

जम्मू-काश्मीरच्या राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यातून सुरक्षा दलांक़डुन‘सुधारित विस्फोटक उपकरण’ जप्त

जम्मू-काश्मीरच्या राजौरी या सीमावर्ती जिल्ह्यातून सुरक्षा दलांनी काल I.E.D, म्हणजेच ‘सुधारित विस्फोटक उपकरण’ जप्त केलं. या उपकरणाचा नियंत्रित स्फोट करून ते निकामी करण्यात आलं. या स्फोटामुळे थाना मंडी भागातल्या अप्पर बंगई गावातल्या एका घराचं नुकसान झाल्याचं आमच्या वार्ताहरानं सांगितलं.

November 16, 2025 2:35 PM

views 29

लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ झालेल्या स्फोटाचे धागेदोरे मिळवण्याचं काम तपास यंत्रणेकडून सुरू

दिल्लीत लाल किल्ला मेट्रो स्थानकाजवळ १० नोव्हेंबर रोजी झालेल्या स्फोटाचे धागेदोरे मिळवण्याचं काम तपास यंत्रणा करत आहेत. देशभरातल्या विविध ठिकाणी अद्याप शोधमोहिमा, तपासण्या सुरू आहेत. दिल्ली गुन्हे शाखेनं आज अल फलाह विद्यापीठाविरोधात फसवणूक आणि बनावट कागदपत्रं तयार केल्याप्रकरणी दोन एफआयआर दाखल केले ...

November 16, 2025 2:21 PM

views 34

देशात विविध ठिकाणी झालेल्या अपघातात किमान १० जणांचा मृत्यू

देशात विविध ठिकाणी झालेल्या अपघातांमधे किमान १० जणांचा मृत्यू झाला.  मध्यप्रदेशात ग्वाल्हेर इथं आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. झाशीहून येणारी फॉर्च्युनर कार, वाळून भरलेल्या ट्रॅक्टर ट्रॉलीवर धडकल्यानंतर कारमधले ५ जण जागीच मरण पावले. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेतले असून पुढे तपास सुरु...