November 17, 2025 2:54 PM

views 30

प्रधानमंत्री तामिळनाडूमधील मेळाव्यात उपस्थित राहणार

तामिळनाडूमध्ये कोइम्बतूर इथं दक्षिण भारतीय जैविक कृषी महासंघातर्फे १९, २० आणि २१ नोव्हेंबरला मेळावा होणार आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सहभागी होणार आहेत.    ते ५० कृषी शास्त्रज्ञांशी चर्चा करतील असं शेतकरी संघटनांचे समन्वयक पी आर पांडियन यांनी सांगितलं. या मेळाव्यात तामिळनाडू, केरळ, कर्ना...

November 17, 2025 2:43 PM

views 15

स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपतराय यांची आज पुण्यतिथी

पंजाबचे सिंह म्हणून ओळखले जाणारे थोर स्वातंत्र्यसेनानी लाला लाजपतराय यांच्या पुण्यतिथीनिमित्त देश आज आदरांजली वाहत आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी,  तसंच काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी लाला लाजपतराय यांना आदरांजली वाहिली आहे.   महाराष्ट्राचे मुख्यम...

November 17, 2025 3:27 PM

views 36

जम्मू काश्मीरमधे दहशतवादी कारवायांचं प्रमाण लक्षणीयरीत्या घटलं असल्याचं लष्करप्रमुखांचं प्रतिपादन

जम्मू-काश्मीरमधल्या दहशतवादी कारवायांमध्ये लक्षणीय घट झाल्याचा दावा लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी केला आहे. नवी दिल्लीत चाणक्य संरक्षण संवाद २०२५च्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. या वर्षी आतापर्यंत ३१ दहशतवादी ठार झाले असून त्यापैकी ६१ टक्के दहशतवादी पाकिस्तानी होते, असंही ते यावेळी म्हण...

November 17, 2025 1:29 PM

views 11

दिल्ली कारस्फोट प्रकरणी आमीर राशीद याला १० दिवसांची एनआयए कोठडी

दिल्लीत लाल किल्ल्याजवळ झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं आमीर राशीद अली, या कश्मिरच्या रहिवाशाला दिल्लीत अटक केली.   असून त्याला पटियाला हाऊस न्यायालयाने १० दिवसांची एनआयए कोठडी दिली आहे.  अमीर यानं, उमर नबी याच्यासोबतीनं स्फोटाचा कट रचला होता, असं तपास यंत्रणेनं म्हटलं ...

November 17, 2025 8:27 PM

views 38

सौदी अरेबियात उमरा यात्रेसाठी गेलेल्या किमान ४० भारतीयांचा बस अपघातात मृत्यू

सौदी अरेबियात बस आणि डिझेल टँकर यांच्यात धडक होऊन झालेल्या दुर्घटनेत ४५ जणांचा मृत्यू झाला असून केवळ १ जण बचावला आहे. मृतांमध्ये १७ पुरुष, १८ महिला आणि १० बालकं आहे. यात मरण पावलेल्या प्रत्येक मृताच्या कुटुंबियाला ५ लाख रुपये मदत म्हणून देणार असल्याचं तेलंगणा  सरकारनं जाहीर केलं आहे. तेलंगणा सरकारचं...

November 17, 2025 2:31 PM

views 65

बिहारमधे मंत्रिमंडळ बरखास्ती आणि मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्यानंतर नवीन सरकार स्थापनेचा मार्ग मोकळा

बिहार विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला मिळालेल्या विजयानंतर राज्यात सरकार स्थापनेसाठी राजकीय हालचालींनी वेग घेतला आहे. मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली आज मावळत्या मंत्रिमंडळाची शेवटची बैठक झाली. यात मंत्रिमंडळ बरखास्तीचा प्रस्ताव मंजूर झाला. त्यानंतर मुख्यमंत्री नितीश कुमार...

November 17, 2025 1:09 PM

views 27

केंद्रिय गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेत आज उत्तर विभागीय मंडळाची बैठक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली हरियाणामधे फरिदाबाद इथं एन झेड सी अर्थात उत्तर विभागीय परिषदेची बैठक सुरू आहे. हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, राजस्थान, दिल्ली, जम्मू आणि काश्मीर, लडाख आणि चंडीगड या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांचा समावेश एन झेड सी मधे होतो.   या सर्व राज्यांचे...

November 17, 2025 10:51 AM

views 25

केरळमध्ये मतदार यादीचं विशेष पुनरीक्षण सुरू

केरळमध्ये,मतदार यादीचं विशेष पुनरीक्षण सुरू आहे. या अंतर्गत आतापर्यंत २ कोटी ६३ लाखांहून अधिक मतदारांना गणना नोंदणी अर्ज वितरित करण्यात आले आहेत, असं मुख्य निवडणूक अधिकारी रथन केळकर यांनी सांगितलं.   एकंदर मतदार संख्येच्या सुमारे ९४ टक्के लोकांना हे अर्ज देण्यात आले आहेत. संपूर्ण माहिती प्रणाली...

November 17, 2025 10:27 AM

views 28

लिबियामध्ये दोन नौका उलटल्यानं चार जणांचा मृत्यू

लिबियामध्ये,अल-खुम्स या शहराजवळ स्थलांतरितांना  घेऊन जाणाऱ्या दोन नौका उलटल्यानं  चार जणांचा मृत्यू झाला. पहिल्या नौकेत बांगलादेशचे २६ जण  होते, तर दुसऱ्या नौकेत ६९ जण होते. संघर्ष आणि गरीबीपासून  सुटका करून घेण्यासाठी युरोपात जाणारे स्थलांतरित मुख्यतः लिबिया मार्गाद्वारे प्रवास करतात.

November 17, 2025 10:44 AM

views 35

यावर्षीचा दुबई एअर शो आजपासून सुरू

यावर्षीचा दुबई एअर शो आजपासून सुरू होत आहे. भारतीय वायु दल आपल्या सुर्यकिरण एरोबॅटीक पथक आणि तेजस या हलक्या लढाऊ विमानांसह यामध्ये सहभागी होणार आहे. संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ भारतीय शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार असून ते संयुक्त अरब अमीरातीच्या संरक्षण मंत्र्यांसोबत यावेळी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत...