December 26, 2025 8:08 PM

views 19

कर्नाटकातल्या हेलियम सिलिंडरच्या स्फोटामुळं दोघांचा मृत्यू

कर्नाटकातल्या म्हैसूर पॅलेस जवळ झालेल्या हेलियम सिलिंडरच्या स्फोटामुळं मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या आता दोनवर पोचली आहे. मृतांमध्ये गंभीर जखमी झालेल्या एका महिलेचा समावेश आहे. या दुर्घटनेत अन्य काही नागरिकही जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे...

December 26, 2025 8:24 PM

views 56

मराठवाड्यात भाजपा – शिवसेना युती?

मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अंतिम टप्प्यात आली असून, उद्यापर्यंत सर्व निर्णय होतील, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यात जालना, परभणी, लातूर आणि नांदेड महापालिकेसाठी देखील बैठका घेऊन अडचणी दूर करण्यात येणार असल्याचंही बावनक...

December 26, 2025 8:03 PM

views 64

अगरबत्तीसाठी नवीन गुणवत्ता मानक जाहीर

अगरबत्तीसाठी भारतीय मानक ब्युरोनं नवीन गुणवत्ता मानक जाहीर केलं आहे. यात अगरबत्ती उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक कीटकनाशकांवर आणि रसायनांवर बंदी घातली आहे. भारताचा ८ हजार कोटी रुपयांचा अगरबत्ती बाजार विस्तारण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे निकष जाहीर झाले आहेत...

December 26, 2025 8:24 PM

views 83

बँक खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत मिळणार!

विविध बँक आणि इतर खात्यांमध्ये पडून असलेले पैसे खातेदारांना परत करण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्रालयाकडून देशभरात विशेष मोहिम सुरू आहे. यामुळं आतापर्यंत २ हजार कोटी रुपये खातेधारकांना परत मिळाले आहेत, अशी माहिती अर्थ मंत्रालयानं आज दिली. विविध बँक खाती, वीमा खाती, म्युच्युअल फंड, लाभांश, समभाग आणि सेवान...

December 26, 2025 7:56 PM

views 11

स्वच्छता आणि अन्नसुरक्ष अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल्सना मिळणार पुरस्कार

उत्तम स्वच्छता आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. ‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम आजपासून ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर ...

December 26, 2025 8:23 PM

views 124

H1B व्हिसाबाबत भारताची अमेरिकेसोबत चर्चा

भारतीय नागरिकांना एच वन बी व्हिसा मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर व्हाव्या याकरता अमेरिकेबरोबर चर्चा सुरू असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी आज नवी दिल्लीत सांगितलं. व्हिसाकरता विलंब होतो, मुलाखतींची वेळ बदलली जाते, या आणि अशा इतर अडचणींमुळे भारतीय नागरिकांना आणि त्यांच्...

December 26, 2025 7:27 PM

views 49

मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची क्षमता दुप्पट होणार

येत्या ५ वर्षात मुंबईसह एकूण ४८ मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या, अशा दोन्ही गाड्यांच्या प्रवासी क्षमतेत ही वाढ होणार आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय ...

December 26, 2025 7:21 PM

views 104

पुण्याचे माजी महापौर प्रशांत जगताप यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पुण्याचे माजी महापौर आणि नुकताच राजीनामा दिलेले राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी पक्षाच्या पुण्यातल्या अनेक पदाधिकाऱ्यांसह आज काँग्रेसमधे प्रवेश केला. मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जगताप आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं पक्षात स्वागत केलं.   ...

December 26, 2025 6:00 PM

views 55

धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची तयारी

धुळे महापालिका निवडणुकीसाठी मैत्रीपूर्ण लढत देण्याची तयारी असल्याचं आज राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक प्रभारी माजी मंत्री अनिल पाटील यांनी धुळ्यात स्पष्ट केलं. प्रत्येक प्रभागातून सक्षम उमेदवार देण्याची तयारी राष्ट्रवादी काँग्रेसनं केली असली तरी महायुतीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव, आणि...

December 26, 2025 5:36 PM

views 45

लातुरच्या निलंगा तालुुक्यात भूकंप नसल्याची नोंद

लातुरच्या निलंगा तालुक्यातल्या निटुर परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचं जिल्हा प्रशासनानं स्पष्ट केलं आहे. मौजे निटुर परिसरात आज दुपारी भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंप सदृष धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाला मिळाली होती. या घटनेनंतर जिल्हा प्रशासनानं नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉ...