January 1, 2025 1:51 PM

views 27

व्यावसायिक वापराचं गॅस सिलिंडर १५ रुपयांनी स्वस्त, घरगुती वापराच्या सिलिंडरच्या किंमती जैसे- थे

पेट्रोलियम कंपन्यांनी व्यावसायिक वापराचे गॅस सिलिंडर १५ रुपयांनी स्वस्त केलं आहे. मुंबई आता १९ किलो वजनाचं LPG सिलेंडर १ हजार ७५६ रुपयांना मिळेल. घरगुती वापराचे LPG सिलिंडरच्या किंमतीत मात्र काहीही बदल झालेला नाही. त्यामुळं हे सिलिंडर ८०२ रुपये ५० पैशांना मिळेल.

January 1, 2025 1:49 PM

views 16

जागतिक ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आर. वैशाली पराभूत

जागतिक ब्लिट्झ बुद्धीबळ अजिंक्यपद स्पर्धेत पुरुषांचं विजेते पद मॅग्नस कार्लसन आणि यान निपोनमीशी यांना संयुक्तरित्या जाहीर झालं आहे. न्यूयॉर्कमध्ये काल झालेला अंतिम सामना बरोबरीत सुटल्यानं दोघांना संयुक्तरित्या विजेतेपदक देण्यात आलं. महिलांच्या श्रेणीत चीनच्या जू वेनजून हिनं विजेतेपदक पटकावलं. चीनच्य...

January 1, 2025 11:06 AM

views 48

छत्रपती संभाजीनगर इथं गुंठेवारी नियमितीकरण योजनेला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात गुंठेवारी नियमितीकरण योजनेला येत्या ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ही मुदत काल संपणार होती, गुंठेवारी वसाहतीमधल्या मिळकत धारकांनी आपले नियमितीकरणाचे प्रस्ताव विहित मुदतीत महानगरपालिकेच्या गुंठेवारी विभागात सादर करावे, नियमितीकरण न केलेल्या मालमत्तांव...

January 1, 2025 10:59 AM

views 15

शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वी तुळजाभवानी मातेच्या मंचकी निद्रेला प्रारंभ

तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्रोत्सवापूर्वीच्या मंचकी निद्रेला कालपासून प्रारंभ झाला. सायंकाळच्या अभिषेक पूजेनंतर तुळजाभवानी माता शेजगृहातील चांदीच्या पलंगावर विसावली. येत्या सात जानेवारीला पहाटे तुळजाभवानी माता पुन्हा सिंहासनारूढ होऊन घटस्थापनेने शाकंभरी नवरात्र महोत्सवाची सुरुवात होईल. ११ जाने...

January 1, 2025 10:58 AM

views 9

शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीसाठीची नोंदणी सहा जानेवारीपर्यंत करता येणार

राज्यातल्या शेतकऱ्यांना सोयाबीन खरेदीच्या नोंदणीसाठी सहा जानेवारीपर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पणन मंत्री जयकुमार रावल यांनी, विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर ही माहिती दिली. नोंदणीची ही मुदत काल संपणार होती. नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी १२ ...

January 1, 2025 10:14 AM

views 13

नाट्यमय घडामोडींनंतर वाल्मिक कराड शरण-१४ दिवसांची सीआयडी कोठडी

बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या तसंच पवनऊर्जा प्रकरणात खंडणीचा आरोप होत असलेले वाल्मिक कराड यांना केज न्यायालयानं १४ दिवसांची कोठडी सुनावली आहे. कराड यांनी काल नाट्यमय घडामोडींनंतर पुण्यात सीआयडी कार्यालयात शरणागती पत्करली. सीआयडीने त्यांना काल रात्रीच केज न्यायालयात हजर केल्याचं, ...

January 1, 2025 10:04 AM

views 48

जल जीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचना

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कालही पुढील शंभर दिवसांत करायच्या कामांच्या अनुषंगानं विविध विभागांची आढावा बैठक घेतली. पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाच्या कामांचा आढावा घेताना जल जीवन मिशन योजनेची कामं युद्धपातळीवर पूर्ण करावीत. ही योजना संपूर्णपणे सौरउर्जेवर चालवावी अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दि...

January 1, 2025 10:02 AM

views 6

कोरेगांव भीमा इथं आज होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमासाठी प्रशासन सज्ज

कोरेगांव भीमा इथं आज होणाऱ्या विजयस्तंभ अभिवादन कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी येणाऱ्या अनुयायांना सुविधांची माहिती मिळावी यासाठी जिल्हा परिषदेनं ‘विजयस्तंभ सुविधा’ ॲप तयार केलं आहे. अभिवादन कार्यक्रमासाठी येणाऱ्या अनुयाय...

January 1, 2025 10:01 AM

views 23

ऊस गाळप हंगामात शेतकर्‍यांची आर्थिक पिळवणूक होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे साखर आयुक्तांचे निर्देश

ऊस उत्पादक शेतकऱ्यांची; मुकादम, वाहतुकदार यांच्याकडून आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी यंदाच्या गाळप हंगामात येणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे निर्देश पुण्यातील साखर आयुक्त डॉक्टर कुणाल खेमनार यांनी दिले आहेत. कार्यकारी संचालक आणि खाजगी साखर कारखान्यांच्या व्यवस्थापक, मुख्य कार्यकारी अधिकारी ...

January 1, 2025 9:45 AM

views 17

हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूहाची भूमिका महत्त्वाची – परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांचं मत

हिंद प्रशांत महासागर क्षेत्रातलं स्थैर्य, प्रगती आणि समृद्धी यामध्ये क्वाड समूह महत्त्वाची भूमिका बजावत आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी म्हटलं आहे. क्वाडच्या स्थापनेला 20 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त भारत, ऑस्ट्रेलिया, जपान आणि अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांनी एक संयुक्त निवेदन ...