November 17, 2025 7:43 PM

views 36

पालघरमध्ये काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला स्थगिती

पालघरमध्ये काशिनाथ चौधरी यांच्या भाजप पक्षप्रवेशाला प्रदेश कार्यालयाकडून स्थगिती देण्यात आली आहे. २०२०मध्ये कोरोना काळात पालघर इथे झालेल्या साधुंच्या हत्येप्रकरणी काशिनाथ चौधरी यांच्यावर भाजपने गंभीर आरोप केले होते. मात्र, आता त्यांनाच पक्षात प्रवेश दिल्यामुळे झालेल्या टीकेनंतर हा निर्णय घेण्यात आला...

November 17, 2025 7:10 PM

views 556

नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत संपुष्टात

राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याची मुदत आज संपुष्टात आली. उद्या, मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील. २६ नोव्हेंबर रोजी उमे...

November 17, 2025 7:10 PM

views 235

आरक्षणाची ५० टक्के कमाल मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ओलांडता येणार नाही – SC

एकंदर आरक्षणावर असलेली ५० टक्क्यांची कमाल मर्यादा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांमध्ये पाळावीच लागेल, असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं आज दिला. बांठिया आयोगाच्या निष्कर्षांच्या आधारे या निवडणुकीत ओबीसी आरक्षण लागू करायच्या सरकारच्या निर्णयासंबंधीच्या याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सु...

November 17, 2025 6:22 PM

views 39

रायगडमध्ये उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला भूमीपुत्रांचा विरोध

रायगड जिल्हात उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या मुंबईला स्थानिक आणि भूमीपूत्र तीव्र विरोध करत आहेत. या योजने अंतर्गत  धेरंड - शहापूर परिसरात सुमारे ३८७ हेक्टर क्षेत्रात उभारल्या जाणाऱ्या सिनारमास कंपनीच्या प्रकल्पाचं सीमांकन आणि तिथवर जाणाऱ्या रस्त्याच्या भराव कामाला सुरुवात झाली. यामुळे संतापलेल्या शे...

November 17, 2025 7:41 PM

views 31

शासकीय सेवांच्या भर्ती परीक्षांच्या निकालानंतर ४ दिवसात नियुक्तीपत्रं मिळणार

शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर किमान चार दिवसात संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र द्यावं, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. वर्षा निवासस्थानी सुशासनासाठी प्रशासकीय सुधारणांबाबत आयोजित सादरीकरण बैठकीत ते बोलत होते. दरवर्षीचा आढावा घेत जानेवार...

November 17, 2025 3:50 PM

views 107

राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस

राज्यात नगरपरिषदा आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी अर्ज करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. उद्या, मंगळवारी अर्जांची छाननी होणार आहे. त्यानंतर वैध उमेदवारांची यादी जाहीर केल्यानंतर १९ ते २१ नोव्हेंबर या दरम्यान ज्या प्रभाग किंवा अर्जावर अपिल आहे असे सोडून इतर ठिकाणी अर्ज मागे घेता येतील.   २६ नोव्हेंबर रोजी...

November 17, 2025 3:27 PM

views 23

बियाणे उत्पादन क्षेत्रातल्या खासगी कंपन्यांनी संशोधन आणि विकासाला प्राधान्य द्यावं- केंद्रीय कृषीमंत्री

कृषी उत्पादनाच्या सरसरीत वाढ करून शेतकऱ्यांचं हित साधण्यासाठी  बियाणे उत्पादन क्षेत्रात बियाणे उत्पादक कंपन्यांनी  संशोधन आणि विकासाला प्राधान्य द्यावं, असं आवाहन केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी केलं आहे. चौहान यांच्या हस्ते आज मुंबईत आशियाई बीज परिषद २०२५ चं उद्घाटन झालं, त्यावेळी ते ब...

November 17, 2025 3:22 PM

views 74

राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कारासाठी यंदा राज्यातल्या दोन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांची निवड

पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय विभागातर्फे दिला जाणारा राष्ट्रीय गोपाळ रत्न पुरस्कार यंदा राज्यातल्या दोन दुग्धोत्पादक शेतकऱ्यांनी पटकावला आहे. देशी दुभत्या पशुंचे संगोपन करणाऱ्या सर्वोत्कृष्ट दुग्धोत्पादक शेतकऱ्यांच्या श्रेणीत कोल्हापूरच्या अरविंद यशवंत पाटील आणि श्रद्धा धवन यांनी पुरस्कार पटकावले आहे...

November 17, 2025 3:13 PM

views 49

प्रसारमाध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून देशाच्या बांधणीत योगदान द्यावं- उपराष्ट्रपती

प्रसारमाध्यमांनी लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून देशाच्या बांधणीत योगदान द्यावं असं आवाहन उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी केलं आहे.  हैदराबाद इथं रामोजी एक्सलन्स अवॉर्ड २०२५ च्या उद्धाटन सोहळ्यात ते काल बोलत होते. आजच्या डिजिटल युगात चुकीची माहिती आणि बनावट बातम्यांचा प्रसार रोखण्याची गरज उपराष्ट्रप...

November 17, 2025 3:06 PM

views 28

तेल कंपन्यांचा अमेरिकेबरोबर पहिल्यांदाच करार

सार्वजनिक क्षेत्रातल्या तेल कंपन्यांनी अमेरिकेबरोबरच पहिल्यांदाच LPG आयातीसाठी करार केला आहे. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीपसिंह पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा करार एक वर्षासाठी लागू असेल. नागरिकांना किफायतशीर दरात LPG उपलब्ध करून देण्यासाठी आणि पुरवठा व्यवस्थेत विविधता आणण्यासाठी सर...