January 3, 2025 4:28 PM

views 20

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज दिल्लीत विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करण्यात आली. जेजे क्लस्टर्समध्ये राहणाऱ्यांसाठी नव्यानं बांधण्यात आलेल्या जवळपास सतराशे सदनिकांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं, तसंच राष्ट्रीय राजधानीच्या अशोक विहार भागातील पात्र लाभार्थींना या घरांच्या ...

January 3, 2025 2:23 PM

views 23

ओदिशाचे राज्यपाल म्हणून डॉ. हरी बाबू कंभमपाटी यांनी घेतली शपथ

ओदिशाचे राज्यपाल म्हणून डॉ. हरी बाबू कंभमपाटी यांनी आज शपथ घेतली. ओदिशा उच्च न्यायलयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती चारधारी शरण सिंग यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. कंभमपाटी यापूर्वी मिझोरमचे राज्यपाल होते.

January 3, 2025 2:22 PM

views 36

केंद्रीय गृहविभागाचे माजी सचिव अजयकुमार भल्ला यांनी मणिपूरचे राज्यपाल म्हणून घेतली शपथ

केंद्रीय गृहविभागाचे माजी सचिव अजयकुमार भल्ला यांनी आज मणिपूरचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मणिपूर उच्च न्यायालयाचे मुक्य न्यायाधीश सिद्धार्थ मृदुल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. मणिपूरचे मुख्यमंत्री एन बीरेन सिंग, विधानसभा अध्यक्ष, मंत्रिमंडळ सदस्य आणि इतर आमदार शपथविधी कार्यक्रमाला उपस्थ...

January 3, 2025 3:18 PM

views 16

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते आसाममधील विविध विकास प्रकल्पांच उद्घाटन

आसाममधील विविध विकास प्रकल्पांच उद्घाटन आज गुवाहाटी इथं केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते झालं. कोकराझार आकाशवाणी केंद्राच्या १० किलोवॅट प्रक्षेपकाचं आणि राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण संस्थेच उद्घाटनही मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं गुवाहाटी...

January 3, 2025 2:17 PM

views 29

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवर परिणाम

देशाच्या उत्तर भागात दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यानं रेल्वे आणि विमानांच्या वाहतुकीवर परिणाम झाला आहे. नवी दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज सकाळी सुमारे ५० उड्डाणांना विलंब झाला. तसंच दिल्लीला जाणाऱ्या २४ रेल्वेगाड्या पाच तास विलंबानं धावत आहेत, असं रेल्वेनं सांगितलं. &nbsp...

January 3, 2025 2:16 PM

views 14

केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयच्या उप अधीक्षकासह अन्य काही जणांविरुद्ध लाच मागितल्याचा आणि विविध बँक खात्यांच्या तसंच हवालाच्या माध्यमातून ती स्वीकारल्याबद्दल गुन्हा

केंद्रीय अन्वेषण संस्था सीबीआयच्या उप अधीक्षकासह अन्य काही जणांविरुद्ध लाच मागितल्याचा आणि विविध बँक खात्यांच्या तसंच हवालाच्या माध्यमातून ती स्वीकारल्याबद्दल गुन्हा नोंदवला आहे. सीबीआयच्या बँक सिक्युरिटीज आणि अपहार शाखेचे अधीक्षक बी. एम. मीना यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आला असल्याचं सीबीआयच्य...

January 3, 2025 2:14 PM

views 22

मुंबई उच्च न्यायालयानं २०१५ च्या गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाच्या तपासावरील देखरेख थांबवण्याचा निर्णय

मुंबई उच्च न्यायालयानं २०१५ च्या गोविंद पानसरे हत्याकांड प्रकरणाच्या तपासावरील देखरेख थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रकरणातल्या दोन फरार आरोपींना शोधून काढण्याचं मुख्य काम आता उरलं आहे, असं न्यायमूर्ती ए एस गडकरी आणि न्यायमूर्ती कमल खाटा यांच्या खंडपीठानं काल सांगितलं. तपास यंत्रणेवरील सततच्या द...

January 3, 2025 2:12 PM

views 13

मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू तर तीन जण गंभीर जखमी

मुंबई-गोवा महामार्गावर आज झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झाले. वीर रेल्वे स्थानकाजवळ एका टोइंग वाहनानं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कारला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. ज्यामुळे कारमधले तीन जण जागीच ठार झाले तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

January 3, 2025 3:01 PM

views 69

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली

स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांना सर्वत्र आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह इतर मान्यवरांनी सावित्रीबाईंच्या योगदानाचं स्मरण केलं आहे.   सावित...

January 3, 2025 1:47 PM

views 19

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क, ग्रीस , पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सुरु

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे अस्थायी सदस्य म्हणून डेन्मार्क, ग्रीस , पाकिस्तान, पनामा आणि सोमालिया या देशांचा दोन वर्षांचा कार्यकाळ कालपासून सुरु झाला. या पाच देशांच्या जबाबदारीचं प्रतीक म्हणून त्यांचे ध्वज रोवण्याचा कार्यक्रम काल सुरक्षा परिषदेच्या न्यूयॉर्क इथल्या मुख्यालयात झाला. इक्वाडोर, जप...