January 3, 2025 8:32 PM

views 30

इस्रायलनं गाझा पट्टीत काल केलेल्या हल्ल्यात बालकांसह ३० जण ठार

इस्रायलनं गाझा पट्टीत काल रात्री केलेल्या हल्ल्यात काही बालकांसह किमान ३० जण ठार झाले असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. इस्रायलनं केलेल्या आदल्या दिवशीच्या हल्ल्यातही डझनभर नागरिक ठार झाले होते. त्यामुळं इस्रायलच्या हल्ल्यात गेल्या २४ तासांत ठार झालेल्या नागरिकांची संख्या ५६ वर पोचली असल्याचं सूत्रांनी...

January 3, 2025 8:30 PM

views 15

महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या भाविकांना रेल्वेतिकीट काढण्यासाठी QR कोड जॅकेट

उत्तर प्रदेशातल्या प्रयागराज इथं होणाऱ्या महाकुंभ मेळ्याला जाणाऱ्या भाविकांना QR कोडद्वारे रेल्वेची तिकीटं सुलभतेनं काढता येतील. QR कोड असलेले हिरव्या रंगाचे जॅकेट परिधान केलेले रेल्वे कर्मचारी रेल्वे स्थानकांच्या परिसरात उपलब्ध असतील. त्यावरुन तिकिट काढण्याची सुविधा मिळणार असल्यानं भाविकांचा वेळ वा...

January 3, 2025 8:23 PM

views 19

वंदे भारत रेल्वेच्या प्रतिताशी कमाल १८० किमी वेगानं धावण्याच्या चाचण्या यशस्वी

शयनयानयुक्त वंदे भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांनी प्रतिताशी कमाल १८० किलोमीटर वेगानं धावण्याच्या कोटा विभागात सुरु असलेल्या तीन दिवसीय चाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या आहेत. वंदे भारत एक्सप्रेस  गाड्यांच्या या चाचण्या महिनाअखेरपर्यंत सुरु राहणार असल्याचं रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं आ...

January 3, 2025 8:18 PM

views 8

प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर

परराष्ट्र मंत्रालयानं आज प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार जाहीर केले. एकूण २७ व्यक्ती आणि संस्थांना हे पुरस्कार जाहीर झाले आहेत. त्यात गयानातली सरस्वती विद्या निकेतन, रशियातला हिंदुस्थानी समाज यांना सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय ऑस्ट्रेलियातले प्राध्यापक अजय राणे, फिजीतले स्वा...

January 3, 2025 8:15 PM

views 21

‘भारत’ जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश – मंत्री पियुष गोयल

११० हुन अधिक युनिकॉर्न स्टार्टअप असलेला भारत देश जागतिक पातळीवरचा तिसरा सर्वाधिक स्टार्टअप परिसंस्था असलेला देश ठरला असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल  आज नवी दिल्ली इथं बातमीदारांशी बोलताना म्हणाले. देशभरातल्या स्टार्टअप पैकी ४३ टक्के स्टार्टअप महिलांनी सुरु केले असल्याची माहित...

January 3, 2025 8:11 PM

views 215

३१व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचं मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांच्या हस्ते उद्घाटन

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव यांच्या हस्ते आज भोपाळमध्ये 31व्या राष्ट्रीय बाल विज्ञान काँग्रेसचं उद्घाटन झालं. जय जवान, जय किसान आणि  जय विज्ञान या मंत्रातूनही याचीच प्रचिती येते, असं ते म्हणाले. त्यांनी याप्रसंगी वराह मिहीर खगोलीय वेधशाळेच्या स्वयंचलीत प्रणालीचं उद्घाटनही केलं. बालकांम...

January 3, 2025 8:07 PM

views 21

मनोरुग्ण रुग्णांबाबत गैरसमज असल्यानं त्यांची काळजी घेणं आव्हान असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

मनोरुग्ण आणि मेंदूशी संबंधित विकाराने ग्रस्त रुग्णांबाबत अनेक गैरसमजुती असल्यानं त्यांची काळजी घेणं समाजापुढे आव्हान बनलं असल्याचं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी म्हटलं आहे.  बंगळुरूच्या निमहान्स या राष्ट्रीय मानसिक स्वास्थ्य आणि मेंदूविज्ञान संस्थेच्या सुवर्णमहोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात आज त...

January 3, 2025 8:02 PM

views 25

टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर देण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

'सर्वांसाठी घरे' ही महत्वाकांक्षी योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात परवडणाऱ्या, टिकाऊ आणि पर्यावरणपूरक घरांवर भर देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. याबाबत सविस्तर धोरण महिन्याभरात तयार करावं, असे निर्देशही त्यांनी दिले. मुंबईत विभागाच्या आढावा बै...

January 3, 2025 7:40 PM

views 8

राज्याचे वाळूधोरण १५ दिवसांत तयार करण्याचा मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा निर्धार

साधारण १५ दिवसांत राज्याचे वाळूधोरण तयार करण्यात येणार असल्याचा निर्धार महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. गौणखनिज आणि वाळूतस्करीसंदर्भात महसूल अधिकाऱ्यांची विस्तृत बैठक घेतली आहे.   मागणी आणि पुरवठा यांच्यातील दरी कमी करण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं ते म्हणाले. गौण खनिजांबाबतचे अधिकार अप्पर...

January 3, 2025 7:40 PM

views 20

उजनी धरणातल्या पाणीसाठ्याचं सूक्ष्म नियोजन करा – मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

उजनी धरणात उपयुक्त पाणीसाठा ९७ टक्के  इतका आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात सिंचनासाठी आणि संपूर्ण उन्हाळा पिण्याचं पाणी उपलब्ध राहील यासाठी सूक्ष्म नियोजन करावं,  धरणात पाणी उपलब्ध आहे म्हणून पाण्याची उधळपट्टी अजिबात करू नये, असं  आवाहन जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केलं  आहे.