January 6, 2025 1:37 PM

views 15

उत्तर आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम

उत्तर आणि पूर्व भारतात थंडीची लाट कायम असून तापमानात घट झाली आहे. दाट धुक्यामुळे दृश्यमानता कमी झाल्यामुळे रेल्वे आणि विमान उड्डाण उशीरानं होत आहेत. जम्मू काश्मीर मधे मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी सुरु आहे. जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग एनएच ४४ बंद करण्यात आला आहे तसचं श्रीनगर ...

January 6, 2025 3:46 PM

views 52

आज मराठी पत्रकारिता दिन…

मराठी पत्रकारिता दिनानिमित्त आज सर्वत्र विविध कार्यक्रम होत आहेत. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची जंयती आणि त्यांनी दर्पण हे पहिलं मराठी नियतकालिक सुरु केलं तो ६ जानेवारीचा दिवस दरवर्षी मराठी पत्रकारिता दिन म्हणून साजरा केला जातो. पत्रकार दिनानिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र...

January 6, 2025 12:45 PM

views 7

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात बैठक

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार जेक सुलिवान यांच्यात आज नवी दिल्लीत बैठक झाली. यात द्विपक्षीय, प्रादेशिक आणि जागतिक सहकार्य अधिक दृढ करण्यावर चर्चा झाली. भारत-अमेरिका यांच्यात घनिष्ठ आणि मजबूत भागीदारी निर्माण करण्यासाठी सुलिवान यांच्या वैयक्तिक योगदानाचं जयश...

January 6, 2025 1:00 PM

views 13

अमेरिकेत हिमवादळाची शक्यता

अमेरिकेच्या कॅन्सस, मिसूरी आणि इंडियाना सारख्या राज्यांमध्ये हिमवादळाची शक्यता असून सुमारे ६ कोटी लोकसंख्येला या हिमवादळाचा तडाखा बसू शकेल असा इशारा अमेरिकेच्या नॅशनल वेदर सर्व्हिसनं दिला आहे. या हिमवादळामुळे ताशी ५० मैल वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेता या भागातून प्रवास करताना काळजी घ्यावी ...

January 6, 2025 10:32 AM

views 14

हॉकी : तामिळनाडू ड्रॅगन्सचा युपी रूद्रास संघावर २-० असा विजय

भारतीय हॉकी संघटनेच्या वतीन आयोजित साखळी सामन्यात, काल तामिळनाडू ड्रॅगन्सनं युपी रूद्रास संघाचा 2-0 ने धुव्वा उडवत पहिल्या विजयाची नोंद केली. त्यामुळे गुणतालिकेत तामिळनाडू तिसऱ्या स्थानावर आहे. अभारन सुदेव आणि थॉमस सॉर्स्बी यानं तामिळनाडूसाठी प्रत्येकी एक गोल केला. तत्पुर्वी झालेल्या सामन्यात सूरमा ...

January 6, 2025 10:33 AM

views 30

फुटबॉल : केरळ ब्लास्टर्सचा पंजाब एफसी संघावर १-० असा विजय

दिल्लीत झालेल्या भारतीय फुटबॉल साखळी सामन्यात केरळ ब्लास्टर्सनं पंजाब एफसी संघाचा 1-0 असा पराभव केला. सामन्यावर पंजाबच्या संघाचं वर्चस्व राखले होते तरीही त्यांना त्याचं गोलमध्ये रुपांत करता आलं नाही. या विजयामुळे केरळ ब्लास्टर्स नवव्या स्थानी पोचला असून, पंजाब एफसी हा चौथा पराभव आहे. पंजाब 18 व्या स...

January 6, 2025 9:30 AM

views 21

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ जप्त

मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर अमली पदार्थ नियंत्रण विभागानं तस्करी होत असलेले अमली पदार्थ जप्त केले. यात 74 हजार कॅप्सूल तसंच अडीच लाख बनावट सिगारेटचा समावेश आहे. आंतरराष्ट्रीय तस्करांकडून मोठ्या प्रमाणात औषधांची तस्करी होत असल्याची माहिती नियंत्रण विभागाला मिळाली होती. त्...

January 6, 2025 1:25 PM

views 16

अमेरिकेनं लादलेले निर्बंध उठवण्याची सिरीयाची विनंती

अमेरिकेनं सीरियावर लादलेले निर्बंध उठवण्याची विनंती सीरियाचे परराष्ट्र मंत्री असद हसन अल-शिबानी यांनी केली आहे. सिरीयातील सामान्य नागरिकांचं जीवनमान पुर्वपदावर आणण्यासाठी हे निर्बंध शिथील कारावेत असं कतारच्या राजनैतिक भेटीदरम्यान ते म्हणाले. कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री यांची त्यांनी काल भे...

January 6, 2025 9:19 AM

views 20

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांच्यात बैठक

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि अमेरिकेचे सुरक्षा सल्लागार जेक सुलीवान यांच्यादरम्यान आज नवी दिल्ली इथं बैठक होणार आहे. सध्या आव्हान असलेले मुद्दे आणि नव्या तंत्रज्ञान अर्थात iCETतसंच दोनही देशांदरम्यानच्या इतर द्विपक्षीय मुद्द्यांवर चर्चा होणार आहे. भारत आणि अमेरिका यांच्यातील संबंध व्याप...

January 6, 2025 12:43 PM

views 15

जागतिक स्तरावर आरोग्याची राजधानी होण्याची भारताची क्षमता – प्रधानमंत्री

जागतिक स्तरावर चांगल्या आरोग्य आणि वैद्यकीय सुविधा देणारी आरोग्याची राजधानी होण्याची क्षमता भारताकडे आहे, मेक इन इंडियाच्या धर्तीवर, जग लवकरच हील इन इंडिया हा मंत्र स्वीकारेल असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. दिल्लीत, केंद्रीय आयुर्वेद संशोधन संस्थेच्या नव्या इमारतीची पायाभरणी प्रध...