January 7, 2025 7:59 PM

views 24

१० जानेवारीला होणाऱ्या घर चलो अभियानामुळे सदस्यता नोंदणीला चालना मिळेल- बावनकुळे

भारतीय जनता पक्षाने दीड कोटी प्राथमिक सदस्य आणि ५ लाख सक्रीय सदस्यांचं लक्ष्य ठेवल्याची माहिती भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे. मुंबईत आज ते वार्ताहर परिषदेत बोलत होते. १० जानेवारी रोजी सुरू होणाऱ्या घर चलो अभियानामुळे सदस्यता नोंदणीला चालना मिळेल, असा विश्वास त्या...

January 7, 2025 7:40 PM

views 37

मुख्यमंत्र्यांचा सात कलमी कृती कार्यक्रम; सर्व सरकारी अधिकाऱ्यांना दिले आदेश

सामान्य नागरिकांचं दैनंदिन जीवन सुकर व्हावं यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज राज्यातल्या सर्व अधिकाऱ्यांना सात कलमी कृती कार्यक्रम निश्चित करुन दिला. त्यांनी आज सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांच्याशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला...

January 7, 2025 7:58 PM

views 26

टोरेस परदेशी कंपनीनं गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

मुंबईत टोरेस या परदेशी कंपनीने गुंतवणूकदारांची जवळपास १३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी या कंपनीच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. गुंतवणूकदारांना १० टक्के परतावा देण्याचं आमिष दाखवून या कंपनीनं अनेकांकडून पैसे गोळा केले आणि त्यानंतर गाशा गुंडाळला. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येत...

January 7, 2025 7:27 PM

views 14

देशाचं भवितव्य घडवण्याची शिक्षकांची महत्त्वाची भूमिका- राजनाथ सिंग

देशाचं भवितव्य घडवण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे असं प्रतिपादन संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी केलं आहे. उत्तरप्रदेश माध्यमिक शिक्षक संघटनेच्या ५७व्या परिषदेचं उद्घाटन आज आग्रा इथं करताना ते बोलत होते. नेहमी योग्य पर्यायाची निवड करण्याचा विवेक विद्यार्थ्यांमधे रुजवण्याचं काम शिक्षक करीत असल्यानं त्...

January 7, 2025 7:23 PM

views 37

धुळे इथं मुलांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सवाचं उद्धाटन

महिला आणि बाल विकास विभागा अंतर्गत जिल्हा क्रीडा संकुल धुळे इथं काळजी तसचं संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी आणि मुलांसाठी चाचा नेहरु बाल महोत्सवाचं उद्धाटन आज झालं. यात विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असून गुरुवारी महोत्सवाचा समारोप होणार आहे. यावेळी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेचं वाचन करण्या...

January 7, 2025 7:22 PM

views 25

शिक्षकांची निवड गुणवत्तेवर करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा निर्माण करण्याची गरज-राज्यपाल

विद्यापीठ आणि महाविद्यालयीन शिक्षकांची निवड गुणवत्तेवर करण्यासाठी पारदर्शक यंत्रणा निर्माण करण्याची गरज राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी व्यक्त केली. मुंबई विद्यापीठाच्या वार्षिक दीक्षांत समारंभात ते आज बोलत होते. यावेळी १ लाख ६४ हजार ४६५ विद्यार्थ्यांना पदवी तर ४०१ विद्यार्थ्यांना पीएच.डी. आणि १८ ...

January 7, 2025 7:17 PM

views 29

बीड डीसीसी बँक मार्च अखेर कर्ज मुक्त होणार

बीड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर असलेलं कर्ज राज्यशासनाच्या मदतीने कमी करून मार्च २०२५ अखेर ही बँक कर्जमुक्त होईल असं बँकेचे प्रशासक आणि जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांनी म्हटलं आहे. बँकेवर ५८ कोटी रुपयांचं कर्ज असून यासाठी शासनाकडून २८ कोटींची मदत मिळणार असल्याचं पाठक यांनी वार्ताहरांना सांगितलं .

January 7, 2025 7:16 PM

views 25

ई-श्रम पोर्टलवर रोज सरासरी ३० हजार असंघटित कामगारांची नोंदणी-डॉ. मनसुख मांडवीय

ई-श्रम पोर्टलवर रोज सरासरी ३० हजार असंघटित कामगारांची नोंदणी होत असल्याचं कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांनी आज सांगितलं. ते आज नवी दिल्ली इथं ई-श्रम पोर्टलच्या बहुभाषिक सुविधेचं उदघाटन करताना बोलत होते. पोर्टलवर नोंदणी केल्यामुळे सामाजिक सुरक्षा योजना आणि उपक्रमांच्या विस्तृत श्रेणीमध...

January 7, 2025 7:11 PM

views 22

सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. शशी आहिरे याचं निधन

नाशिक जिल्हा महिला सहकारी बॅंकेच्या माजी अध्यक्ष, आणि सहकार भारतीच्या माजी प्रदेशाध्यक्ष डॉ. शशी आहिरे याचं आज सकाळी नाशिकमध्ये निधन झाले. त्या ७६ वर्षांच्या होत्या. डॉ. शशी आहिरे यांनी महिलांच्या  सक्षमीकरणासाठी नाशिक जिल्हा महिला सहकारी बँकेच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य केलं. या बँकेच्या त्या २० ...

January 7, 2025 7:09 PM

views 35

उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन आणि सुरक्षितता महत्वाची

उज्ज्वल भविष्यासाठी नियोजन आणि सुरक्षितता महत्वाची असून, महिलांनी  सुरक्षा विमा आणि जीवनज्योती योजनेचा लाभ घ्यावा, असं अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी बी. वैष्णवी यांनी आज सांगितलं.  उमेद, अर्थात ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे अधिकारी आणि आणि बँकर्स साठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत त...