January 10, 2025 3:47 PM

views 12

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरुप बदल करण्याची गरज – मुख्यमंत्री

उद्योगविषयक धोरणांमध्ये कालानुरुप बदल करण्याची गरज असून यासंदर्भात तातडीनं आराखडा तयार करण्याची कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. त्यांनी काल राज्य शासनाच्या १०० दिवसांच्या आराखड्यासंदर्भात उद्योग विभागाचा आढावा घेतला. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित ह...

January 9, 2025 8:26 PM

views 9

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या एच एस प्रणॉय, आणि मालविका बनसोडचं आव्हान संपुष्टात

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा एच. एस. प्रणॉय आणि मालविका बनसोड या दोघांचं आव्हान संपुष्टात आलं आहे. पुरुष एकेरीच्या उपउपांत्यपूर्व फेरीत चीनच्या ली शिफेंग यानं प्रणॉयवर ८-२१, २१-१५, २१-२३ असा विजय मिळवला, तर महिला एकेरीच्या प्राथमिक फेरीत चीनच्याच हान युए हिनं मालविकावर २१-१८, २१-११ अशी म...

January 9, 2025 8:21 PM

views 25

उद्यापासून आकाशवाणीतर्फे ‘कुंभ वाणी’ ही नवीन वृत्तवाहिनी सुरु होणार

महाकुंभमेळ्याला वाहिलेली ‘कुंभ वाणी’ नावाची नवीन वृत्तवाहिनी आकाशवाणीतर्फे सुरु होणार असून तिचं उद्घाटन उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते उद्या होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यात नव्या ‘कुंभ मंगल धून’ चं  पहिलं सादरीकरण होणार आहे. कुंभ वाणी या वाहिनीवर उद्यापासून २६ फेब्रुवारीपर्यंत...

January 9, 2025 8:14 PM

views 21

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार

छत्तीसगडमध्ये सुकमा जिल्ह्यात आज सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ३ नक्षली ठार झाले. सुकमा आणि विजापूर या जिल्ह्यांच्या सीमेवरच्या जंगलात जिल्हा राखीव पोलीस दल, विशेष कृती दल आणि कोब्रा बटालियनचं संयुक्त पथक नक्षली विरोधी मोहिमेवर असताना ही चकमक सुरू झाली. बराच वेळ ही चकमक सुरु होती.

January 9, 2025 8:12 PM

views 21

‘सेंद्रिय शेती’ अधिक उत्पन्न आणि उत्तम रोजगार मिळवून देणारं माध्यम – मंत्री पियुष गोयल

सेंद्रिय शेती हे अधिक उत्पन्न आणि उत्तम रोजगार मिळवून देणारं माध्यम आहे असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. राष्ट्रीय सेंद्रिय उत्पादन कार्यक्रमाच्या ८ व्या भागाचं उद्घाटन करताना ते आज नवी दिल्लीत बोलत होते. सध्या देशाच्या सेंद्रिय उत्पादनांची  निर्यात सहा हजार कोटी र...

January 9, 2025 8:04 PM

views 20

नेपाळमध्ये काठमांडू इथं ‘प्रवासी भारतीय दिन’ साजरा

नेपाळमध्ये काठमांडू इथं आज ‘प्रवासी भारतीय दिन’ साजरा करण्यात आला. नेपाळमधल्या भारतीय दूतावास आणि भारतीय नागरिक संस्थेतर्फे त्याचं  आयोजन करण्यात आलं होतं . यावेळी भारतीय नागरिक संस्थेचे अध्यक्ष मनोज कांदोई यांनी नेपाळच्या प्रगतीमध्ये भारतीय नागरिकांच्या योगदानाबद्दल माहिती दिली. नेपाळमधले भारताचे र...

January 9, 2025 7:59 PM

views 12

जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी जग भारताकडे आशेने पाहत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

विविध जागतिक समस्यांवर उपाय शोधण्यासाठी आज जग भारताकडे आशेने पाहत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज दिल्लीत आयोजित जीनोमिक्स डेटा कॉन्क्लेव्हला व्हीडीओ संदेशाद्वारे संबोधित करत होते. जीनोम इंडिया प्रकल्प हा देशाच्या जैवतंत्रज्ञान विषयातला एक निर्णायक प्रकल्प असल्याचं ते म्हण...

January 9, 2025 7:35 PM

views 24

बुलढाण्यात केस गळतीचं प्रमाण वाढलं, नागरिक हैराण

बुलढाणा जिल्ह्याच्या शेगाव तालुक्यात पूर्णा नदीकाठच्या विविध गावांमध्ये केस गळतीचे प्रमाण अचानक मोठ्या प्रमाणावर वाढलं असल्याबाबत आरोग्य विभागाने त्वचारोग तज्ज्ञांच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरू केलं आहे. आतापर्यंत ५१ नागरिकांचे डोक्यावरचे केस पूर्णपणे गळून गेल्याचं आढळलं असून रुग्णांचे नमुने प्रयोगश...

January 9, 2025 7:29 PM

views 22

‘सकारात्मक उपाययोजनांमधून मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल’

सकारात्मक उपाययोजनांच्या माध्यमातून मानव आणि वन्यजीवांमधला संघर्ष कमी करण्याचा मार्ग निघेल, असा विश्वास वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केला आहे. ते आज चंद्रपूरमध्ये ‘वाईल्डकॉन – २०२५’ या दोन दिवसीय परिषदेच्या समारोप सत्रात बोलत होते. संरक्षित क्षेत्रांच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणा...

January 9, 2025 7:23 PM

views 7

राज्यात डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवण्यास सुरुवात

राज्यात अनधिकृत मासेमारी नौकांवर नजर ठेवण्यासाठी ड्रोनच्या सहायानं देखरेख ठेवणारी डिजिटल डेटा मेंटेनन्स यंत्रप्रणाली राबवायला आजपासून सुरुवात झाली. मत्स्यव्यवसाय आणि बंदरमंत्री नितेश राणे यांनी आज मुंबईतल्या आयुक्त कार्यालयात नियंत्रण कक्षाचं उद्घाटन केलं. मुंबई शहरात ससून गोदी, मुंबई उपनगरात गोराई,...