January 13, 2025 11:03 AM

views 11

इस्त्रोने स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत चेसर आणि टार्गेट हे दोन उपग्रह सुरक्षित अंतरावर आणण्यात मिळवले यश

भारतीय अंतरिक्ष संशोधन संस्था अर्थात इस्त्रोनं स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत चेसर आणि टार्गेट हे दोन उपग्रह सुरक्षित अंतरावर अर्थात 3 मीटर अंतरावर आणण्यात यश मिळवलं आहे. या उपग्रहावर बसवण्यात आलेल्या कॅमेऱ्याने काढलेली छायाचित्र पाठवण्यास सुरुवात झाल्याची माहिती इस्त्रोनं समाजमाध्यमावरील संदेशात देण्यात ...

January 13, 2025 10:43 AM

views 28

महिला क्रिकेट्च्या दुसऱ्या सामन्यात भारताचा आयर्लंडवर 116 धावांनी विजय

महिला क्रिकेटमध्ये राजकोट इथं झालेल्या मर्यादित षटकांच्या दुसऱ्या सामन्यात काल भारतानं आयर्लंडवर 116 धावांनी विजय मिळवला. आणि या तीन सामन्यांच्या या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. काल नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतानं निर्धारित 50 षटकात 5 खेळाडूंच्या मोबदल्यात 370 धावा केल्या. जेमिमा र...

January 13, 2025 10:40 AM

views 16

पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात आज राहील थंडीची लाट

आज पंजाब, हरियाणा, चंदीगड, दिल्ली आणि पश्चिम राजस्थानच्या काही भागात थंडीची लाट राहील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. उत्तरेकडील, पूर्वेकडील आणि ईशान्येकडील राज्यांमध्ये पुढील 2 दिवस सकाळी आणि रात्री दाट धुकं राहील. हवामान खात्याने उद्यापर्यंत अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, ताम...

January 13, 2025 10:33 AM

views 21

चालकाने प्रसंगावधान राखल्याने अंबाजोगाई तालुक्यात बस अपघाताचा अनर्थ टळला

चालकानं प्रसंगावधान राखल्यानं अंबाजोगाई तालुक्यात काल बस अपघाताचा मोठा अनर्थ टळला. तालुक्यातल्या पठाण मांडवा घाटात प्रवाशी घेऊन जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाले. बस चालक पारजी उबाळे यांनी यावेळी प्रसंगावधान दाखवत बस घाटाच्या कठड्यावर आदळवली. यात ती घाटातल्या झाडांना अडकून अपघात टळला.

January 13, 2025 10:31 AM

views 19

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या शाळांध्ये राबवण्यात येतोय स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल उपक्रम

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या विविध शाळांमध्ये सध्या १७ हजारावर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मनपा आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांच्या संकल्पनेतून मनपाच्या शाळेत स्मार्ट स्कूल टू बेस्ट स्कूल हा उपक्रम राबवण्यात येत आहे. ‘‘या प्रकल्पांतर्गत मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बैठक व्यवस्था, स्मार्ट...

January 13, 2025 10:29 AM

views 26

विश्व मराठी संमेलनात यंदा श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा अशा ग्रंथांवर होणार चर्चा

पुण्यात होणार असलेल्या विश्व मराठी संमेलनात यंदा प्रथमच श्रीमद्भगवद्गीता, ज्ञानेश्वरी, संत तुकारामांची गाथा अशा ग्रंथांवर चर्चा होणार असल्याची घोषणा, मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी केली. रत्नागिरीत सुरू असलेल्या कीर्तनसंध्या उपक्रमाला काल भेट दिल्यानंतर ते बोलत होते. मराठी संस्कृती जगभरात नेण्यास...

January 13, 2025 9:41 AM

views 29

प्रा.डॉ.जयकुमार शामराज यांना भारत सरकारचे पेटंट मंजूर

धाराशिव इथल्या व्यंकटेश महाजन वरिष्ठ महाविद्यालयातले प्राणीशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. जयकुमार शामराज यांना भारत सरकारचं पेटंट मंजूर झालं आहे. जलचर प्रजाती नियंत्रण पद्धतीच्या उपकरणासाठी हे पेटंट मंजूर करण्यात आलं. या उपकरणाद्वारे मत्स्यपालानातील पाण्याची गुणवत्ता आणि प्रजातीचं आरोग्य, याचं निरीक्षण...

January 12, 2025 8:33 PM

views 18

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम

स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त राज्यपाल सी.पी, राधाकृष्णन यांनी आज राजभवनात विवेकानंदाच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केलं.     माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरोचं  सोलापूर कार्यालय आणि  विवेकानंद केंद्रांची सोलापूर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रीय यु...

January 12, 2025 8:20 PM

views 16

परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर उद्यापासून स्पेनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर

परराष्ट्रव्यवहार मंत्री एस जयशंकर उद्यापासून स्पेनच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. या भेटीत ते द्विपक्षीय संबध तसंच क्षेत्रीय आणि जागतिक घडामोडींवर त्यांचे स्पॅनिश समपदस्थ मॅन्युअल अल्बेरिस यांच्याशी चर्चा करतील.  ते स्पॅनिश राजदूतांच्या नवव्या वार्षिक परिषदेलाही ते संबोधित करतील तसंच भारतीय समुदायाशी...

January 12, 2025 8:19 PM

views 17

छत्तीसगडमध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच माओवादी ठार

छत्तीसगडमध्ये आज सकाळी  सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत पाच  माओवादी ठार झाले असून  यात दोन महिला बंडखोरांचा समावेश आहे.  बिजापूर जिल्हयातल्या राष्ट्रीय उद्यानात माओवाद्यांनी आश्रय घेतल्याची माहिती गुप्तचर यंत्रणांकडून मिळाल्यावर सुरक्षा दलांच्या संयुक्त पथकांनं या भागात  शोध मोहिम राबवली.  या अभियान...