January 14, 2025 3:17 PM

views 31

‘‘सबका साथ, सबका विकास आणि सबका  विश्वास’, भारताचं धोरण जगभरात पोचण्याची आवश्यकता’

‘सबका साथ, सबका विकास आणि सबका  विश्वास’, हे भारताचं धोरण जगभरात पोचण्याची आवश्यकता असल्याचं प्रतिपादन परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी आज केलं. ते स्पेनमधल्या भारतीय समुदायाला संबोधित करत होते.  स्पेनच्या दौऱ्यात भारतीय समुदायासमोर बोलताना त्यांनी, भारताची जगभरातील वाढती प्रतिष्ठा आणि ध्रुव...

January 14, 2025 1:57 PM

views 34

UGC-NET Exam : 15 जानेवारीला होणारी युजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली

राष्ट्रीय चाचणी संस्था - एनटीएनं उद्या १५ जानेवारीला नियोजित युजीसी नेट परीक्षा पुढे ढकलली आहे. पोंगल, मकरसंक्रांत आणि इतर सणांच्या पार्श्वभूमीवर ही परीक्षा पुढे ढकलावी अशी मागणी करण्यात येत होती, त्यामुळे हा निर्णय घेण्यात आल्याचं एनटीएनं निवेदनाद्वारे कळवलं आहे.

January 14, 2025 1:57 PM

views 22

खो-खो विश्वचषक स्पर्धेत भारताची विजयी सलामी

खो-खो विश्वचषक स्पर्धेला काल नवी दिल्ली इथे सुरुवात झाली. उपराष्ट्रपती जगदीप धनखड, भारतीय ऑलिंपिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी. टी. उषा आणि भारतीय खोखो महासंघाचे अध्यक्ष सुधांशु मित्तल यांनी मशाल प्रज्ज्वलित करून स्पर्धेचं औपचारिक उद्घाटन केलं.    या स्पर्धेत काल झालेल्या सामन्यात भारतीय संघाने नेपा...

January 14, 2025 9:47 AM

views 20

सिंगापूरचे राष्ट्रपती थरमन षणमुगरत्नम पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर

भारत आणि सिंगापूर दरम्यानच्या द्विपक्षीय धोरणात्मक संबंधाना ६० वर्ष पूर्ण होत असून, या पार्श्वभूमीवर सिंगापूरचे राष्ट्रपती थरमनषणमुगरत्नम हे आजपासून पाच दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्याबरोबर एक उच्च स्तरीय शिष्टमंडळही येत आहे. या दौऱ्यात राष्ट्रपती थरमन षणमुग रत्नम हे राष्ट्रपती द्रौपदी ...

January 14, 2025 9:54 AM

views 8

देशात प्रत्यक्ष कर संकलनात १६ टक्क्यांची वाढ

देशात चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कर संकलनात 16 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली असून तो सुमारे 16 लाख 90 हजार कोटी रुपये इतका झाला आहे. तसच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाच्या अहवालानुसार देशात सकल प्रत्यक्ष कर संकलनातही 20 टक्क्यांची वाढ झाली असून तो आतापर्यंत 20 लाख कोटीच्या वर संकलित झाला आहे. मागील आ...

January 14, 2025 9:20 AM

views 19

देशात १३ लाख ६८ हजार क्विंटल सोयाबीनची किमान आधारभूत किंमतीनं खरेदी – कृषीमंत्री

सरकारनं आतापर्यंत जवळपास १३ लाख ६८ हजार क्विंटल सोयाबीनची किमान आधारभूत किंमतीनं खरेदी केली असल्याची माहिती केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी दिली. महाराष्ट्रात सोयाबीन खरेदीची मुदत ३१ जानेवारीपर्यंत तर राजस्थानात ४ फेब्रुवारीपर्यंत वाढवण्यात आली असल्याचंही चौहान यांनी का...

January 14, 2025 10:05 AM

views 21

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेला आजपासून सुरुवात

भारतीय खुल्या सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धा आजपासून नवी दिल्लीत सुरू होत आहेत. यामध्ये भारताच्या ३६ ऑलिंपिकपटूसह जगातल्या विविध देशांचे २०० खेळाडू यामध्ये सहभागी होत आहेत, पॅरिस ऑलिंपिक २०२४ नंतर बऱ्याच कालावधीनंतर भारताची अव्वल बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधु या स्पर्धेत सहभागी होत असून तिचा आज पहिला महिला ए...

January 14, 2025 8:55 AM

views 12

राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार – मंत्री अशोक उईके

राज्यात अनुसूचित जमाती आयोगाची स्थापना करणार असल्याचं, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी सांगितलं आहे. ते काल नाशिक इथं वार्ताहरांशी बोलत होते. प्रत्येक आश्रमशाळा, वसतिगृह हे विभागाच्या सचिवांपासून प्रकल्प अधिकाऱ्यांपर्यंत प्रत्येक अधिकाऱ्याला दत्तक देऊन, संबंधितांनी महिन्यातून किमान एकदा प्रत्यक...

January 14, 2025 8:41 AM

views 22

बीडमध्ये आजपासून २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी

बीड जिल्ह्यात आजपासून २८ जानेवारीपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. जिल्ह्यात सध्या सुरू असलेली आणि नियोजित असलेली विविध आंदोलनं, आणि त्यातून उद्भवणारी संभाव्य परिस्थिती या पार्श्वभूमीवर हे आदेश लागू करण्यात आले आहेत.   लातूर जिल्ह्यातही अपर जिल्हादंडाधिकारी केशव नेटके यांनी शस्त्रबंदी...

January 14, 2025 8:42 AM

views 8

नाशिकमध्ये झालेल्या अपघातात ७ जणांचा मृत्यू, १३ जण जखमी

नाशिकमध्ये द्वारका भागात परवा रात्री झालेल्या भीषण अपघातात मरण पावलेल्यांची संख्या आता ७ झाली आहे, तर १३ जण जखमी झाले आहेत. राज्य शासनानं मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. जखमींवरील उपचाराचा खर्चही शासनातर्फे करण्यात येईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर क...