January 15, 2025 8:43 PM

views 23

आपत्कालीन परिस्थितीत भारताचा नेहमीच मदतीचा हात – मंत्री पियुष गोयल

शेजारी राष्ट्रांमध्ये आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली तर भारतानं नेहमीच मदतीचा हात सर्वप्रथम पुढे केला आहे,असं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत आयोजित वर्ल्ड काँग्रेस ऑन डिझायस्टर मॅनॅजमेण्ट या परिषदेत ते बोलत होते. बचाव आणि मदत कार्यामध्ये सशस्त्र सेनेचं ...

January 15, 2025 8:21 PM

views 17

बॅडमिंटन : महिला एकेरीत भारताच्या अनुपमा उपाध्याय हिचा उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

इंडिया ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरी प्रकारात भारताच्या अनुपमा उपाध्याय हिने उप उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने पहिल्या फेरीत भारताच्याच रक्षिता रामराज हिचा २१-१७, २१-१८ असा सरळ गेममध्ये पराभव केला. भारताच्या मालविका बनसोड आणि आकर्शी कश्यप तर पुरुष एकेरीत भारताचे प्रियांशू राजावत आणि...

January 15, 2025 8:43 PM

views 11

बांगलादेशाच्या माजी प्रधानमंत्री बेगम खालिदा झिया यांची सर्वोच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता

झिया चॅरिटेबल ट्रस्ट भ्रष्टाचार प्रकरणात आज बांगलादेशच्या सर्वोच्च न्यायालयानं बांगलादेशच्या माजी प्रधानमंत्री बेगम खालिदा झिया, त्यांचा मुलगा तारिक रहमान आणि इतरांची निर्दोष मुक्तता केली. या प्रकरणात उच्च न्यायालयानं त्यांना दोषी ठरवून शिक्षा ठोठावली होती.  उच्च न्यायालयानं त्यांच्या पाच वर्षांच्या...

January 15, 2025 8:09 PM

views 8

देशाची व्यापारी तूट गेल्या डिसेंबरमधे २१ अब्ज ९४ कोटी डॉलर्सपर्यंत

देशाची व्यापारी तूट गेल्या डिसेंबरमधे २१ अब्ज ९४ कोटी डॉलर्सपर्यंत पोहोचली. गेल्या नोव्हेंबरच्या तुलनेत ती सुमारे १० अब्ज ९०कोटी डॉलर्सने कमी झाली आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीत म्हटलंय की, नोव्हेंबरमधे ३२ अब्ज ११ कोटी डॉलर मूल्याची निर्यात झाली. तर डिसेंबरम...

January 15, 2025 8:07 PM

views 6

मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या हस्ते काशी तामिळ संघम ३.० आणि केटीएस पोर्टलचं उद्घाटन

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज काशी तामिळ संघम ३.० आणि केटीएस पोर्टलचं नवी दिल्लीत उद्घाटन केलं.  पुढच्या महिन्यात १५ ते २४ तारखेपर्यंत यंदा काशी तामिळ संघम पाळला जाईल असं ते म्हणाले. या उपक्रमात १२०० प्रतिनिधी, कारागीर आणि नवोन्मेषी सहभागी होणार आहेत. औषधांची सिद्धचिकित्सा पद्धती ...

January 15, 2025 8:04 PM

views 26

लष्कर दिन हा वर्षाचे ३६५ दिवस, डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांचे आहेत – संरक्षणमंत्री राजनाथ सिंह

लष्कर दिन हा फक्त एका दिवसाचा कार्यक्रम नाही, तर वर्षाचे ३६५ दिवस, डोळ्यात तेल घालून देशाचं रक्षण करणाऱ्या लष्कराच्या जवानांचे आहेत, असं प्रतिपादन संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी केलं आहे. ७७व्या लष्कर दिनाचं मुख्य संचलन आज पुण्यात बॉम्बे इंजिनिअरिंग ग्रुपच्या मैदानावर झालं, त्यावेळी गौरवगाथा या कार...

January 15, 2025 7:21 PM

views 34

सोलापूर इथं गड्डा यात्रेत जनावरांचा बाजार

सोलापूर इथल्या गड्डा यात्रेत जनावराच्या बाजाराला सुरुवात झाली आहे. या बाजारात मुऱ्हा, म्हैसाणा म्हैस, खिलार खोंड, गाय, कालवड, गिर गाय होस्टन, जर्सी गाय विक्रीसाठी आणण्यात आली आहेत. पंढरपुरी म्हशीला कोल्हापूर,  बेळगाव, हुबळी, धारवाड इथल्या शेतकऱ्यांची तर मुऱ्हा म्हशीला तेलंगणा, आंध्रप्रदेशातल्या शेतक...

January 15, 2025 6:52 PM

views 5

ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते रघुनाथ तळवलकर यांचं निधन

मुंबईतले ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते रघुनाथ तळवलकर यांचं काल मुंबईत वार्धक्यानं निधन झालं. ते ८७ वर्षांचे होते. मुंबईत भूदान यज्ञ समिती, मुंबई सर्वोदय मंडळाची स्थापना झाल्यानंतर सुरवातीच्या काळात आलेल्या कार्यकर्त्यांपैकी रघुनाथ तळवलकर एक होते. त्यांनी आणि त्यांच्या पत्नी पुष्पाताई यांनी दादर, कुर्ल...

January 15, 2025 6:50 PM

views 23

चलन बाजारात रुपया २८ पैशांनी वधारला

चलन बाजारात आज रुपया २८ पैशांनी वधारला. डॉलरच्या तुलनेत गेले काही दिवस सतत घसरणाऱ्या भारतीय रुपयाचं मूल्य आज प्रति डॉलर ८६ रुपये ३६ पैसे असं झालं. अमेरिकेत भांडवली बाजारातली घसरण आणि कच्च्या तेलाच्या किमती उतरल्यानं डॉलर कमजोर झाल्याचं मानलं जात आहे. 

January 15, 2025 6:47 PM

views 18

संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडला न्यायालयानं २२ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी  सुनावली आहे. सुनावणीनंतर कराडला न्यायालयाबाहेर घेऊन जात असताना त्याच्या समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी कराड समर्थक आणि विरोधकांनी एकमेकांविरोधात घोषणाबाजी केली. त्यामुळे पो...