January 17, 2025 10:08 AM

views 28

उपराष्ट्रपती आजपासून तीन दिवसांच्या लक्षद्विप दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून तीन दिवसांच्या लक्षद्विप दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात अनेक सार्वजनिक कार्यक्रमांना उपस्थित राहणार असून, विविध सार्वजनिक प्रकल्पांचं त्यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे तसंच स्वयं-सहाय्यता गट आणि त्यांचे लाभार्थी यांच्याशी ते संवाद साधतील.

January 17, 2025 9:46 AM

views 103

आठव्या वेतन आयोगाची स्थापना करायला केंद्र सरकारची मंजुरी

केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकांसाठी आठव्या वेतन आयोगाची स्थापना करण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. याच्या शिफारशी 2026 पासून लागू होतील. सातव्या वेतन आयोगाचा कालावधी पुढच्या वर्षी संपणार आहे. तोपर्यंत या वेतन आयोगाच्या शिफारसी प्राप्त होतील, असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विन...

January 17, 2025 9:35 AM

views 25

इस्त्रोची स्पेडेक्स मोहिम यशस्वी

इस्रोच्या महत्त्वाकांक्षी स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रह एकमेकांशी जोडण्याचं डॉकिंग काल यशस्वी झालं. या मोहिमेअंतर्गंत अवकाशात सोडलेल्या चेसर आणि टार्गेट या दोन उपग्रहांना इस्रोनं यशस्वीरित्या जोडलं. इस्रोच्या या यशामुळे अशा प्रकारचं तंत्रज्ञान असलेला भारत हा जगातला चौथा देश ठरला आहे. &...

January 16, 2025 9:03 PM

views 17

चित्रपटाच्या माध्यमातून देशाची समृद्ध परंपरा देशातल्या नागरिकांपर्यंत पोहोचत आहे – संजय जाजू

चित्रपटाच्या माध्यमातून देशाची समृद्ध परंपरा देशातल्या नागरिकांपर्यंत पोहोचत असल्याचं प्रतिपादन केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी केलं आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये १०व्या अजिंठा-वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ते बोलत होते. देशाच्या कानाकोपऱ्यात चित्रपट महोत्सवांची वाढती संख्या, चित्...

January 16, 2025 8:57 PM

views 18

मतदानासाठी विलंब केल्याचा इस्राइलचा हमासवर आरोप

गाझा पट्टीतली युद्धबंदी आणि ओलिसांच्या सुटकेसाठीच्या करारावर मतदानासाठी विलंब केल्याचा आरोप इस्राइलने हमासवर केला आहे. मात्र, हमासने हा आरोप फेटाळून लावला असून युद्धबंदीसाठी वचनबद्ध असल्याचं म्हटलं आहे. येत्या रविवारपासून या कराराची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या करारानुसार, इस्रायली सैन्य गाझा पट...

January 16, 2025 8:46 PM

views 11

महाकुंभात १० देशांमधून आलेल्या एकूण २१ सदस्यांनी त्रिवेणी संगमात स्नान केलं

प्रयागराज मध्ये सुरु असलेल्या महाकुंभात आज १० देशांमधून आलेल्या एकूण २१ सदस्यांनी त्रिवेणी संगमात डुबकी मारली. त्यांनी हेलिकॉप्टर मधूनही महाकुंभाच्या गर्दीचं दर्शन घेतलं. या शिष्टमंडळाला परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं आमंत्रित केलं होतं. या शिष्टमंडळात फिजी, फिनलंड, गयाना, मलेशिया मॉरिशस, सिंगापूर, द...

January 16, 2025 8:40 PM

views 19

जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या १५ संशयास्पद मृत्यूंची सरकार चौकशी करणार

जम्मू काश्मीरच्या राजौरी जिल्ह्यातल्या बंधल गावात गेल्या महिन्यात झालेल्या १५ संशयास्पद मृत्यूंची सरकार चौकशी करणार आहे. यासाठी ११ जणांची विशेष  तपास  समिती नेमण्यात आली आहे. राजौरीच्या पोलिस महासंचालकांनी ही घोषणा केली आहे. मृतांच्या अवशेषामध्ये न्युरोटोक्सिक घटक आढळले असून त्याची सखोल तपासणी करून ...

January 16, 2025 8:37 PM

views 19

दिल्ली विधानसभा : आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांनी उमेदवारी अर्ज भरले

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आज आम आदमी पक्षाचे मनीष सिसोदिया, सौरभ भारद्वाज, गोपाल राय यांनी उमेदवारी अर्ज भरले. भाजपाचे हरिष खुराणा, मनजिंदर सिंग सिरसा, आशिष सूद आणि कपिल मिश्रा यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. काँग्रेस नेते संदीप दीक्षित, अरीबा खान यांनीही आज उमेदवारी अर्ज भरले. या उमेदवारांसाठी वि...

January 16, 2025 8:35 PM

views 8

२५व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत चंद्रपुरातल्या जवाहर नवोदय विद्यालयानं विजेतेपद पटकावलं

२५ व्या राष्ट्रीय युवा संसद स्पर्धेत चंद्रपूर इथल्या जवाहर नवोदय विद्यालयानं विजेतेपद पटकावलं आहे. आज नवी दिल्ली इथं केंद्रीय विधी आणि न्यायमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या हस्ते या विद्यालयाला फिरती ढाल आणि करंडक प्रदान करण्यात आला.  यावेळी संबंधित विभागांमधे प्रथम आलेल्या ७ नवोदय विद्यालयांनाही मे...

January 16, 2025 8:23 PM

views 19

प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज

प्रजासत्ताक दिनानिमित्त हवाई प्रदर्शन दाखवण्यासाठी भारतीय हवाई दल सज्ज आहे. सुमारे ४० विमानं कर्तव्यपथावर विविध कसरतींचं प्रदर्शन करतील. यंदा मिग २९, राफेल, सुखोई ३०, जग्वार, अपाचे,  C-130 आणि C - 17 यासारखी लढाऊ विमानं सादरीकरणात भाग घेतील.    याशिवाय हवाई दलाची एक तुकडी सुद्धा कर्तव्यपथावर प्...