January 17, 2025 8:23 PM

views 25

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अल-कादिर विद्यापीठ ट्रस्ट प्रकरणी १४ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुरुंगात उभारलेल्या तात्पुरत्या न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ही शिक्षा सुनावली. तुरुंगवासाच्या शिक्षेसोबतच इम्रान खान या...

January 17, 2025 8:19 PM

views 28

बॅडमिंटन : महिलांच्या एकेरी उपांत्यपूर्व फेरीत पी.व्ही. सिंधूचा पराभव

भारतीय खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत आज झालेल्या महिलांच्या एकेरी उपांत्यपूर्व फेरीत पी व्ही सिंधू हिचा इंडोनेशियाच्या ग्रेगोरिया मारिस्का तुनजुंग हिनं ९-२१,२१-१९,१७-२१ असा पराभव केला. नवी दिल्लीत हा सामना झाला.  

January 17, 2025 8:47 PM

views 29

भारतीय वंशाचे कॅनडातले संसद सदस्य चंद्र आर्य कॅनडाच्या प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीत

भारतीय वंशाचे कॅनडातले संसद सदस्य, चंद्र आर्य यांनी आपण कॅनडाच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत उतरल्याची अधिकृत घोषणा केली आहे. कर्नाटकातल्या तुम कुर जिल्ह्याचे मुळ रहिवासी असलेले आर्य, हे कॅनडातल्या नेपीयन विभागातून संसद सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

January 17, 2025 8:47 PM

views 20

राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचा १९ जानेवारीला सहावा वर्धापन दिन

एनएफडीसी अर्थात राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाअतंर्गत येणाऱ्या मुंबईतल्या पेडर रोड इथं असलेल्या राष्ट्रीय भारतीय चित्रपट संग्रहालयाचा सहावा वर्धापन दिन येत्या रविवारी, १९ जानेवारीला साजरा केला जात आहे. वर्धापनदिनानिमित्त संग्रहालय आतून पाहण्याची संधी १३ वर्षे आणि त्याखालील मुलांना निःशुल्क मिळणार ...

January 17, 2025 7:23 PM

views 12

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसला जाणार

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस २० ते २४ जानेवारी या काळात दावोसला जाणार आहेत. राज्याच्या सर्व क्षेत्रात आणि सर्व विभागात गुंतवणूक आणण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

January 17, 2025 7:39 PM

views 19

नाशिक – त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडोरची निर्मिती करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

नाशिक जिल्ह्याला राज्याचं धार्मिक केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दृष्टिने नाशिक - त्र्यंबकेश्वर धार्मिक कॉरिडोरची निर्मिती करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिले. नाशिक आणि त्र्यंबकेश्वर इथे २०२७ मध्ये भरणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगानं पूर्वतयारीविषयी आज सह्याद्री अतिथीगृहा...

January 17, 2025 7:39 PM

views 23

एसटी महामंडळात दरवर्षी ५ हजार बसची खरेदी होणार

एसटी महामंडळ दरवर्षी स्वमालकीच्या ५ हजार साध्या बस खरेदी करणार आहे. त्यासाठीमहामंडळा अंतर्गत पंचवार्षिक नियोजन करण्याचा निर्णय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज जाहीर केला. तसंच महामंडळात यापुढे कुठल्याही पद्धतीनं भाडेतत्त्वावर बस न घेण्याचा निर्णय घेतल्याचंही सरनाईक यांनी सांगितलं. नवीन बसेसच्या...

January 17, 2025 7:40 PM

views 22

सैफ अली खान हल्लाप्रकरणी एक संशयित ताब्यात

अभिनेता सैफ अली खानवर हल्ल्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी एका संशयिताला पकडलं आहे. त्याला वांद्रे पोलीस ठाण्यात नेलं असून त्याची कसून चौकशी करण्यात येत आहे. दरम्यान सैफ अली खान यांच्यावर शस्त्रक्रीया करून पाठीत अडकलेला चाकूचा तुकडा डॉक्टरांनी काढला आहे. सैफ यांच्या जिवाचा धोका टळला असला तरी विश्रांतीचा स...

January 17, 2025 7:03 PM

views 16

१५ फेब्रुवारीनंतर औषध वगळता इतर कुठल्याही खरेदीला मान्यता न देण्याचे वित्त विभागाचे आदेश

चालू आर्थिक वर्षातला निधी खर्च करायचा म्हणून १५ फेब्रुवारी नंतर औषध वगळता इतर कुठल्याही खरेदीला मान्यता देऊ नये, असे आदेश राज्य सरकारच्या वित्त विभागानं सरकारी कार्यालयांना दिले आहेत. संगणक, झेरॉक्स मशीन, फर्निचर दुरुस्ती, कार्यशाळा आयोजन यासारख्या गोष्टी करण्यालाही वित्त विभागानं मनाई केली आहे. आर्...

January 17, 2025 8:26 PM

views 10

स्थानिक केबलचालकांना ऑनलाइन नोंदणीची सुविधा देण्यासाठी नियमांमधे दुरुस्ती

स्थानिक केबलचालकांची नोंदणी सुलभ करण्यासाठी १९९४ मधल्या केबल टेलिव्हिजन नेटवर्क नियमांमधे दुरुस्ती करणारी अधिसूचना आज माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केली. त्यानुसार आता ही नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीनं होईल आणि अर्जदारांच्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर प्रत्यक्ष परवाने देण्यात येतील. देशात ...