January 19, 2025 8:31 PM

views 34

इस्रायल आणि हमास यांच्यात सहा आठवड्यांचा युद्धविराम

इस्रायल आणि हमास यांच्यातल्या सहा आठवड्यांचा युद्धविराम आज तीन तासांच्या विलंबानं सुरू झाला. सध्या सुरू असलेला  संघर्ष निवळण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण पाऊल असून युद्धविरामाची सुरूवात झाल्याच्या वृत्ताला आज मध्यस्थ देश कतारनं पुष्टी दिली आणि सुरुवातीला सुटका होणाऱ्या तीन बंदिवानांपैकी काहीजण पर...

January 19, 2025 7:07 PM

views 13

महाराष्ट्रचा विकास हेच आपलं ध्येय – उपमुख्यमंत्री अजित पवार

महाराष्ट्रचा विकास हेच आपलं ध्येय असून त्यापासून तसूभरही मागं हटायचं नाही, असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. शिर्डी इथं पक्षाच्या नवसंकल्प शिबिराच्या समारोप सत्रात ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेस हा सर्व धर्मांचा आदर करणारा आहे, हे कृतीतून दिसावं...

January 19, 2025 7:00 PM

views 34

इंडियन ओपन बॅडमिंटन : डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसेननं पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलं

डेन्मार्कच्या व्हिक्टर ॲक्सेलसेन यानं नवी दिल्लीत झालेल्या इंडियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचं जेतेपद पटकावलं आहे. आज झालेल्या अंतिम सामन्यात त्यानं हाँगकाँगच्या सी यू ली याच्यावर २१-१६, २१-८ अशी थेट गेम्समध्ये मात केली. महिला एकेरीत दक्षिण कोरियाची ॲन से यंग अजिंक्य ठरली. तिनं थायलंडच्या ...

January 19, 2025 6:54 PM

views 16

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला मानवी मूत्रापासून ऊर्जेच्या निर्मितीसाठीचं अमेरिकन पेटंट

नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाला मानवी मूत्रापासून ऊर्जेच्या निर्मितीसाठीचं अमेरिकन पेटंट प्राप्त झालं आहे. विद्यापीठातले संशोधक प्रा. डॉ. राजाराम माने आणि डॉ. झोयेक शेख यांच्या चमूनं   मानवी मूत्रापासून कार्बन पदार्थाची निर्मिती केली असून  या कार्बन पदार्थाचा वापर ऊर्जा निर्मित...

January 19, 2025 6:51 PM

views 21

बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग क्रमांक १ वर उद्यापासून सुधारित वेळापत्रक लागू होणार

सिडकोच्या बेलापूर ते पेंधर मेट्रो मार्ग क्रमांक एक वर उद्यापासून, म्हणजेच २० जानेवारीपासून, सुधारित वेळापत्रक लागू होणार आहे. सकाळी आणि संध्याकाळी जास्त गर्दीच्या वेळेत दर दहा मिनिटांनी मेट्रो धावणार आहे, त्यामुळे प्रवाशांना आता  थांबावं लागणार  नाही! सकाळी ६ वाजल्यापासून मेट्रो सेवा सुरू होईल, बेला...

January 19, 2025 6:45 PM

views 26

ठाण्यात बांगलादेशी नागरिकाला अटक

ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडी शहरात पोलिसांनी एका बांगलादेशी नागरिकाला अटक केली आहे. शांतिनगर पोलीस या बांगलादेशी नागरिकाची सखोल चौकशी करत आहेत. त्याच्याकडची सर्व कागदपत्रं बनावट असल्याचं आढळून आल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

January 19, 2025 7:14 PM

views 28

संविधान सभेच्या चर्चेचा गौरवशाली वारसा, भारत घडवण्यासाठी प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’ मधून आवाहन

संविधान सभेत झालेल्या चर्चा, सदस्यांनी मांडलेले विचार, हा आपला सर्वात मोठा वारसा असून संविधान निर्मात्यांना अभिमान वाटावा, असा भारत घडवण्यासाठी कार्यरत राहिलं पाहिजे, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज ‘मन की बात’ कार्यक्रमातून केलं.   भारताच्या प्रजासत्ताकाचा ७५ वा वर्धापन दिन, तसंच ...

January 19, 2025 8:16 PM

views 31

सैफ अली खान हल्लाप्रकरणी मुख्य संशयिताला ५ दिवसांची पोलीस कोठडी

बॉलीवुड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला प्रकरणी मुख्य संशयिताला मुंबई पोलिसांनी ठाण्यातून अटक केली असून त्याला न्यायालयानं ५ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. त्याचं नाव मोहम्मद शरीफ इस्लाम शहजाद असं असून तो मूळचा बांग्लादेशी असल्याचा संशय आहे. त्याने आधी आपलं नाव विजय दास असं सांगितलं होतं, पण पोलि...

January 19, 2025 8:29 PM

views 22

देशातल्या काही भागात हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता

पश्चिमी वाऱ्यांमुळे  जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड आणि हिमालयाच्या पश्चिमी रांगांमधे पुढचे ५ दिवस हिमवृष्टी आणि पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्रविभागाने वर्तवली आहे. पंजाब, हरयाणा,  उत्तरप्रदेशचा पश्चिम भाग, दिल्लीतलं राष्ट्रीय राजधानी क्षेत्र आणि उत्तर राजस्थान या ठिकाणी येत्या २२ आणि ...

January 19, 2025 8:32 PM

views 22

महाकुंभ मेळ्यातल्या प्रभाग क्रमांक १९मध्ये भीषण आग

प्रयागराज इथं सुरू असलेल्या महाकुंभमेळ्यातल्या प्रभाग क्रमांक १९मध्ये आज दुपारी भीषण आग लागली. प्रशासनानं तातडीनं आग आटोक्यात आणली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या घटनेबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आण...