January 21, 2025 1:22 PM

views 13

प्रजासत्ताक दिन संचलनाची जोरदार तयारी सुरु

येत्या रविवारी २६ जानेवारीला प्रजासत्ताक दिनानिमित्त नवी दिल्लीत कर्तव्य पथावर होणाऱ्या शानदार संचलनाच्या कार्यक्रमात भारताचं सांस्कृतिक वैभव आणि भारतीय सैन्य दलाचं कौशल्य याचं दर्शन घडणार आहे. त्यात सहभागी होणाऱ्या पथकांचा कसून सराव चालू आहे. हवाई दलाच्या हेलिकॉप्टर्सनी आज हवाई कसरतीचा सराव केला. &...

January 21, 2025 2:57 PM

views 32

दिल्ली विधानसभेच्या ७० जागांसाठी ६९९ उमेदवार रिंगणात

दिल्ली विधानसभा निवडणुकीत ७० जागांसाठी ६ हजार ९९ उमेदवार रिंगणात आहेत. नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक म्हणजे २३ उमेदवार असून पटेल नगर आणि कस्तुरबा नगर मतदारसंघात सर्वात कमी म्हणजेच प्रत्येकी पाच उमेदवार रिंगणात आहेत. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ हजार ५२२ अर्जांपैकी ४८७...

January 21, 2025 8:49 AM

views 26

रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती

राज्य सरकारनं रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती दिली आहे. मात्र प्रजासत्ताक दिनी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये त्यांच्याच हस्ते ध्वजारोहण होईल, असा शासन निर्णय सरकारनं जारी केला आहे. आदिती तटकरे यांची रायगडच्या आणि गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली होती. दरम्य...

January 21, 2025 8:45 AM

views 23

छत्रपती संभाजीनगरमध्ये बांगलादेशी शोधमोहीम राबवण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बांगलादेशी नागरिक शोधमोहीम राबवणार असल्याचा इशारा, पालकमंत्री संजय शिरसाट यांनी दिला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी काल सिल्लोड इथं उपविभागीय अधिकारी लतीफ पठाण यांची भेट घेऊन बांगलादेशी घुसखोर या विषयी चर्चा केली, या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्...

January 21, 2025 8:44 AM

views 39

धाराशिवमध्ये आयुष्यमान कार्ड काढण्याच्या मोहिमेची अंमलबजावणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत विविध आजारावरील उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी महत्त्वाच्या आयुष्यमान भारत कार्ड काढण्याच्या मोहिमेची धाराशिव जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ.सचिन ओंबासे यांनी दिले. यासंदर्भातल्या आढावा बैठकीत ते काल बोलत होते. आयुष्यमान कार्ड काढण्यास...

January 21, 2025 8:34 AM

views 43

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही – उपमुख्यमंत्री अजित पवार

लाडकी बहीण योजना बंद होणार नसून, ज्या महिलांचं उत्पन्न अडीच लाख रुपयांच्या आत आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळत राहील, असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते काल जालन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. सरकारनं तीन हजार ७०० कोटी रुपयांचा धनादेश महि...

January 20, 2025 8:27 PM

views 18

भारतात आर्थिक सुधारणांमुळे GDP दर 7-8% टक्के राहील- GDP अध्यक्ष बोर्ग ब्रेन्डे

भारतात आर्थिक सुधारणांमुळे मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकीच्या पार्श्वभूमीवर जीडीपी अर्थात राष्ट्रीय स्थूल उत्पादन वाढीचा दर सात ते आठ टक्के राहील असा अंदाज डब्ल्यूइएफ अर्थात जागतिक आर्थिक मंचाचे अध्यक्ष आणि कार्यकारी अधिकारी बोर्ग ब्रेन्डे यांनी वर्तवला आहे. स्वित्झर्लंडमधल्या दावोस इथं आज या मंचाची ५५ ...

January 20, 2025 8:25 PM

views 20

छत्तिसगडमधे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार

छत्तिसगडमधल्या गरियाबंद जिल्ह्यात आज सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन माओवादी ठार झाले. घटनास्थळावर सापडलेली  स्वयंचलित रायफल जप्त करण्यात आली आहे.  या चकमकीत कोब्रा बटालियनचा एक जवान जखमी झाला आहे. त्याला रायपूरला हलवण्यात आलं आहे.

January 20, 2025 8:24 PM

views 24

भारत जागतिक स्तरावरचा सातव्या क्रमांकावरचा कॉफी उत्पादक देश

गेल्या आर्थिक वर्षात भारताकडून होणारी कॉफीची निर्यात १ अब्ज २९ कोटी डॉलर्स इतकी झाली असून आता भारत जागतिक स्तरावरचा सातव्या क्रमांकावरचा कॉफी उत्पादक देश बनला आहे. वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने एका पत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. २०२०-२१ या काळात भारताने ७१ कोटी ९० लाख रुपये किमतीची कॉफी निर्यात क...

January 20, 2025 8:15 PM

views 21

पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार- मंगलप्रभा लोढा

जागतिक बँकेसोबत झालेल्या करारानुसार मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या माध्यमातून पुढच्या शंभर दिवसांत ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याचं कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभा लोढा यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. मुंबईसह नागपूर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, अमरावती, पुणे इथं महाराष्ट्र...