January 22, 2025 11:06 AM

views 24

जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तटस्थ तज्ज्ञाने सिंधू पाणी कराराच्या संदर्भात भारताच्या भूमिकेचे केले समर्थन

जम्मू आणि काश्मीरमधील दोन जलविद्युत प्रकल्पांवर भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेल्या मतभेदांवर सिंधू पाणी करारांतर्गत निर्णय घेण्यास सक्षम असल्याचं जागतिक बँकेने नियुक्त केलेल्या तटस्थ तज्ज्ञाने जाहीर केलं आहे. या तज्ज्ञाने प्रकल्पांच्या आरेखनाविषयी असलेली चिंता विचारात घेण्यासाठी लवाद नेमण्याची पाकिस्त...

January 22, 2025 10:55 AM

views 26

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून प्रधानमंत्री आज भाजपच्या मतदान केंद्र कार्यकर्त्यांशी साधणार संवाद

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा भाग म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भाजपाच्या मतदान केंद्र कार्यकर्त्यांशी नमो अॅप्लिकेशनद्वारे संवाद साधणार आहेत. “मेरा बूथ सबसे मजबूत” हे या उपक्रमाचं घोषवाक्य आहे. या उपक्रमाअंतर्गत, दिल्लीतील 256 प्रभागांतील, 13 हजार 33 पक्षाचे खासदार, आमदार, मतदान केंद...

January 22, 2025 10:39 AM

views 21

भारत-इंग्लंड क्रिकेट संघांदरम्यान वीस षटकांच्या मालिकेला आजपासून सुरुवात

भारत आणि इंग्लंड पुरुष क्रिकेट संघादरम्यान टी-20 सामना मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. पाच सामन्यांच्या मालिकेतील आजचा पहिला सामना कोलकाता इथं ईडन गार्डन्स मैदानावर खेळला जाणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सामन्याची सुरुवात होईल. संघाचं नेतृत्व सूर्यकुमार यादव करत आहे. 6 फेब्रूव...

January 22, 2025 10:10 AM

views 19

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ

राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाच्या रुग्णसंख्येत दुपटीने वाढ झाली आहे. पहिल्या पंधरवड्यात चिकुनगुनियाचे सर्वाधिक 20 रुग्ण अकोला महापालिकेत आढळले आहेत. हिवतापाचे सर्वाधिक 185 रुग्ण बृहन्मुंबई महापालिकेत नोंदविण्यात आले असून, त्या खालोखाल गडचिरोलीत 138 रुग्ण आढळून आ...

January 22, 2025 10:04 AM

views 25

येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

येत्या २५ जानेवारीला राष्ट्रीय मतदार दिनी काँग्रेस पक्षानं राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा दिला आहे. राज्यात ५० लाख मतं कशी वाढली याची माहिती निवडणूक आयोग देत नाही, म्हणून आम्ही आंदोलन करणार असल्याचं, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पाटोले यांनी सांगितलं. ते काल मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्याच्य...

January 22, 2025 10:00 AM

views 17

लातूर : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या विभागीय क्रीडा स्पर्धांना सुरुवात

लातूर जिल्ह्यात उदगीर इथं आश्रम शाळांमधल्या विद्यार्थ्यांच्या दोन दिवसीय विभागीय क्रीडा स्पर्धेला काल प्रादेशिक उपसंचालक दिलीपकुमार राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रारंभ झाला. लातूर, धाराशिव, नांदेड आणि हिंगोली जिल्ह्यातल्या आश्रमशाळेतले विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.

January 22, 2025 9:58 AM

views 17

छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

छत्रपती संभाजीनगर इथले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शहरप्रमुख विश्वनाथ स्वामी यांनी अनेक पदाधिकारी तसंच शिवसैनिकांसोबत काल भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत मुंबईत पक्ष कार्यालयात हा प्रवेश सोहळा पार पडला. मागास बहुजन कल्याण मंत्री अतुल ...

January 22, 2025 9:54 AM

views 26

नागपूर इथल्या प्राध्यापकांनी तयार केलेल्या फोल्डिंग हेल्मेटला आंतरराष्ट्रीय पेटंट

दुचाकीस्वार आणि त्याच्या मागे बसणारा सहप्रवासी, या दोघांच्या सुरक्षेसाठी हेल्मेट वापरणं आवश्यक आहे. नागपूरच्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठातले भौतिक शास्त्राचे प्राध्यापक डॉ. संजय ढोबळे आणि त्यांची विद्यार्थिनी आदिती देशमुख यांनी दुचाकीस्वारांसाठी फोल्डिंग हेल्मेट विकसित केलं आहे. या अनोख्या...

January 22, 2025 9:53 AM

views 10

दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार प्रतिलिटर पाच रुपये अनुदान

राज्यातल्या सहकारी तसंच खाजगी दूध प्रकल्पांना दूध पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना शासनाने प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याचं निश्चित केलं आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार १६७ दूध उत्पादकांच्या खात्यात १५ कोटी ८ लक्ष रुपये अनुदान जमा झालं आहे.

January 22, 2025 9:38 AM

views 12

न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी घेतली मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ

तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती आलोक आराधे यांनी काल मुंबई उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्ती पदाची शपथ घेतली. काल सायंकाळी मुंबईत झालेल्या एका छोटेखानी समारंभात राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी न्यायमूर्ती आराधे यांना पदाची शपथ दिली.