January 22, 2025 3:22 PM

views 11

ठाण्यात ५ कोटी रुपये किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त

ठाणे पोलिसांनी काल ५ कोटी रुपये किंमतीचं ५ किलो अंबरग्रीस म्हणजेच व्हेल माशाची उलटी जप्त केली. या प्रकरणी पुण्याजवळ दीघी इथून एकाला अटक करण्यात आली आहे. ८० लाख रुपयांची अंबरग्रीस घेऊन एक जण ठाण्यातल्या साकेत मध्ये येणार असल्याची खबर मिळाल्यावरुन ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकानं ही कारवाई केली. आरोपी...

January 22, 2025 3:39 PM

views 26

नाशिक इथल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात

नाशिक इथल्या संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पौषवारीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून देवस्थान पोलीस प्रशासन आणि नगरपालिकेनं यासाठी नियोजन केलं आहे. या उत्सवासाठी राज्याच्या विविध भागातून त्र्यंबकेश्वरच्या दिशेनं दिंड्या येत आहेत. संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पौषवारी उद्यापासून ते २७ जानेवार...

January 22, 2025 3:13 PM

views 37

एसटीच्या सर्व बस स्थानकांवर “हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवविणार – प्रताप सरनाईक

शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पुढील वर्षभर राज्यभरातल्या एसटीच्या सर्व बसस्थानकांवर “हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बसस्थानक अभियान” राबवण्यात येणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याबाबतची घोषणा केली. यानिमित्तानं राज्यभरात प्रत्येक बसस्थानका...

January 22, 2025 8:19 PM

views 34

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्रला पुरस्कार

निवडणूक काळात उत्तम कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय निवडणूक आयोगानं महाराष्ट्राला पुरस्कार जाहीर केला आहे. मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोकलिंगम यांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. २०२४-२५ या वर्षासाठी महाराष्ट्रासोबत जम्मू आणि काश्मिर तसंच झारखंडलाही पुरस्कार जाहीर झाला आहे. याशिवाय मुंबई शहरचे जिल्हाधिकार...

January 22, 2025 3:08 PM

views 26

पालघरमध्ये पाणथळ भागांमध्ये हळदी कुंकू पक्षांचे थवे

पालघर जिल्ह्यात पाणथळ भागांमध्ये अनेक स्थलांतरित पक्षांचे थवे दिसत असून यात प्रामुख्याने स्पॉटबिल्ड डक या पक्षाचा समावेश आहे. बदकांच्या पंखाच्या बाजूने पांढऱ्या, तपकिरी आणि हिरव्या रंगाचे पट्टे असतात तसंच, यांचे पाय तांबड्या रंगाचे असतात. चोचीवर असलेल्या लाल आणि पिवळ्या रंगामुळे या बदकांना स्थानिक भ...

January 22, 2025 2:16 PM

views 21

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांकडून प्रचाराला सुरुवात

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी विविध राजकीय पक्षांनी प्रचाराला सुरुवात केली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी तसंच आम आदमी पार्टीचे समन्वयक अरविंद केजरीवाल यांच्या प्रचारसभा होणार आहेत. मोदी आज दूरदृष्यप्रणालीमार्फत बूथ पातळीवरच्या भाजपा कार्यकर्त...

January 22, 2025 2:07 PM

views 3

शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांची प्रकृती स्थिर

पंजाबच्या खनौरी सीमेवर गेले ५८ दिवस शेतकरी नेते जगजीत सिंह डल्लेवाल यांचं बेमुदत उपोषण सुरू आहे. डल्लेवाल यांची प्रकृती बिघडल्याने त्यांच्यावर उपचार करण्यात आले असून आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी प्रलंबित असून या सुनावणीदरम्यान डल्लेवाल यांच्या प्रकृतीचा अहवाल...

January 22, 2025 2:01 PM

views 13

देशातल्या काही राज्यात तुरळक ठिकाणी उद्या पहाटेपर्यंत राहील दाट धुकं

बिहार, पश्चिम बंगाल, झारखंड, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या राज्यात तुरळक ठिकाणी आज रात्रीपासून ते उद्या पहाटेपर्यंत दाट धुकं राहील, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. दिल्लीतही दाट धुकं पसरलं असून त्यामुळे रेल्वे आणि हवाई वाहतूक विस्कळीत झाली आहे. हिमाचल प्...

January 22, 2025 1:58 PM

views 26

अहिल्यानगर जिल्ह्यात सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू

महाराष्ट्राच्या अहिल्यानगर जिल्ह्यात आज सकाळी झालेल्या कार अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. अपघातग्रस्त कुटुंब एका लग्नसोहळ्यावरून घरी परतत असतानाच हा अपघात झाल्याचं पोलिसांनी सांगितलं.

January 22, 2025 1:56 PM

views 27

श्रीलंका: युनायटेड नॅशनल पार्टी, समगी जना बालवेगया हे दोन्ही पक्ष स्थानिक सरकारच्या निवडणुकांसाठी एकत्र येण्यास सहमत

श्रीलंकेत आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये युनायटेड नॅशनल पार्टी आणि समगी जना बालवेगया या दोन्ही पक्षांनी पहिल्या फेरीत संयुक्त आघाडी म्हणून लढण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेची राजधानी कोलंबो इथं काल झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी झालेल्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये हे दोन...